Sarthi e sakal
कोल्हापूर

बार्टीप्रमाणे आम्हालाही 'सरसकट' फेलोशिप द्या ! सारथी'च्या संशोधक विद्यार्थ्यांची मागणी, बेमुदत साखळी उपोषण सुरू

सारथी फेलोशिपसाठी संशोधक विद्यार्थी आक्रमक, विद्यापीठातील नोंदणीच्या तारखेपासून फेलोशिप देण्याची मागणी

CD

SARTHI Research Fellowship:‘सारथी’च्या सरसकट संशोधक विद्यार्थ्यांना ‘बार्टी’प्रमाणे विद्यापीठ नोंदणी दिनांकापासून फेलोशिप द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी सारथी कृती समितीने आंदोलन पुकारले आहे. याअंतर्गत संशोधक विद्यार्थ्यांनी सारथीच्या कोल्हापुरातील उपकेंद्रासमोर बेमुदत साखळी उपोषण आजपासून सुरू केले. न्याय मिळेपर्यंत उपोषण करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केला आहे.


उपोषणाच्या माहितीचे निवेदन विद्यार्थ्यांनी सारथी उपकेंद्राच्या सहव्यवस्थापकीय समन्वयक किरण कुलकर्णी यांना दिले. २०२३ मधील पात्र संशोधक विद्यार्थ्यांना तत्काळ सरसकट फेलोशिप द्यावी, बार्टीप्रमाणे विद्यापीठ नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळावी, सारथी कृती समिती शिष्टमंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांसोबत घडवून आणावी, अशा प्रमुख मागण्या आहेत. त्यांनी ‘एक मराठा लाख मराठा’, ‘सारथी वाढवा मराठा घडवा’, ‘सरसकट हवी सारथी फेलोशिप’, अशा घोषणा दिल्या.

आंदोलनात संभाजी खोत, अभय गायकवाड, सुहास रोमणे, प्रियांका पाटील, स्नेहल करपे, ममता जगताप, वैष्णवी पाटील, सनदकुमार खराडे, ऋषीराज भोसले, अमृता पाटील, तेजश्री जाधव, भाग्यश्री देसाई, अंजली शेळके आदी उपस्थित होते. दरम्यान, भाजपचे पश्‍चिम विभागीय सहसंयोजक हेमंत पाटील यांनी निवेदन स्वीकारले. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून मागण्यांच्या पूर्ततेबाबत सकारात्मक प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.

न्याय मिळेपर्यंत उपोषण
मागण्या ‘सारथी’च्या व्यवस्थापकीय संचालकांना कळविल्या आहेत. पूर्ततेबाबत पाठपुरावा होईल. उपोषण थांबविण्याचे आवाहन किरण कुलकर्णी यांनी केले. त्यावर शासनाकडून जोपर्यंत पूर्ततेबाबत न्याय आणि लिखित स्वरूपात ग्वाही मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतल्याचे कृती समितीचे अध्यक्ष संभाजी खोत यांनी सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जमीन-जागा विक्रीतील थांबणार फसवणूक! प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्याने काढावा ‘सर्च रिपोर्ट’; बॅंक कर्जाचा बोजा असलेली प्रॉपर्टी विकता येत नाही, वाचा...

दुर्दैवी योगायोग! 'चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू'; वीस दिवसांपूर्वी बँकेच्या अधिकाऱ्याचा मृत्यू अन्..

Panchang 17 November 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! लाडक्या बहिणींच्या ‘E-kyc’ला निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ? उद्या संपणार 2 महिन्यांची मुदत; 1 कोटींवर महिलांनी अजूनही केली नाही ‘ई-केवायसी’

Liquid Gold For Winters: हिवाळ्यात राहाल निरोगी, सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' हेल्दी ड्रिंक

SCROLL FOR NEXT