satej patil criticized on BJP in kolhapur political crisis on documents 
कोल्हापूर

अधिकाऱ्यांच्या जीवावरच भाजप सत्तेत येणार होतं : सतेज पाटील

सुनील पाटील

कोल्हापूर : आम्ही सत्तेवर येणारच आहोत, बहुमत आम्ही सिध्द करणारच आहोत हा भाजपचा दावा अधिकाऱ्यांच्या जीवावर केला जात होतो, हे आता सिध्द झाले आहे. शासकीय यंत्रणेचा वापर करुन भाजप सत्तेत येण्याचा प्रयत्न करत होते. केंद्र सरकारच्या एकाधिकारशाही सत्तेच्या माध्यमातून अधिकारी बळी पडत आहेत. महाविकास आघाडीतील तीन पक्षाने बहुमताने जे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे, त्यामध्ये भाजपने बिघाडी आणण्यापेक्षा विरोधी पक्षाची प्रामाणिकपणे भूमिका निभवावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज केले. 

पाटील म्हणाले, शासनाचे जो अहवाल गोपनीय म्हणून होता. तो अहवाल बाहेर गेला. हा अहवाल विरोधी पक्ष नेते पत्रकार परिषदेमध्ये दाखवतात हे खूपच वाईट आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने असा प्रकार घातक आहे. विरोध पक्षनेत्यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणूनही काम केले आहे. त्यांनी ही गोपनियता पाळायला हवी होती. पण भाजपला काहीही करुन सत्ता हवी आहे. त्यासाठी ते कायदा मोडतील. गोपनीय कायदा कोणता आहे, त्याचे पालन करणार नाही. असेचे त्यांचे घातक धोरण आहे. 

 गोपीनिय रिपोर्ट बाहेर येण्याचा घटनाक्रम पाहिला तर असे लक्षात येते की रश्‍मी शुक्‍लांच्याबाबतीतील वक्तव्य समोर आली आहेत. यामध्ये आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही धाडसाने शुक्‍लांबाबत स्पष्टता दिली आहे. अजून अशी किती आमदार आहेत, ज्यांना अधिकाऱ्यां माध्यमातून दबाव टाकण्यात आला आहे. हे तपासून पहावे लागले. शुक्‍लांच्यामाध्यमातून अनेक आमदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला असणार आहे. याची माहिती घ्यावी लागले. ज्यांच्यावर दबाव टाकण्यात आला तेही लोक लवकरच समोर येतील, असे दिसत असल्याचेही श्री पाटील यांनी सांगितले. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे स्वत:चीच चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. एखादी समिती नेमूण सर्व प्रकारची चौकशी करावी यासठी पत्रही दिले आहे. गृहमंत्री स्वत:हून आपली चौकशी करा म्हणत आहेत, त्याठिकाणी ते कुठल्याप्रकारे चुक करतील असे वाटत नाही. यामध्येच त्यांचा प्रामाणिकपणा दिसून येतो. त्यांच्यावर खोटे आरोप होत आहेत. 

विरोधीपक्ष नेत्यांना दिलेला गोपनीय अहवाल कोणी दिला? कसा फुटला? याची चौकशी करावी लागेल. सत्ता कोणाची आहे, यापेक्षा महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी तो अहवाल बाहेर कोणी दिला हे विरोधीपक्ष नेत्यांनी सांगितले पाहिजे. फडणविस यांनी स्वत:ची विश्‍वासार्हता टिकवायची असेल तर कागपकागदपत्रे कोणी दिली ? हे त्यांनी सांगितले पाहिजे, असे आवाहनही पालकमंत्र्यानी केले. 

भाजपमधील अनेक लोक कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेत यायला तयार आहेत. हे लोक भाजप सोडून जावू नयेत यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष आमची सत्ता येणार आहे. महाविकास आघाडीची सत्ता जाणार आहे. अस म्हणत आहेत. भाजपमध्ये अधिक प्रमाणात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतीलच लोक जास्त आहेत. त्यांना आधार मिळावा म्हणून चंद्रकांत पाटील वारंवार आघाडीची सत्ता जाणार आहे, असे म्हणत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT