satej patil said in meeting after 24 feb lockdown possible at for night in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात रात्रीची संचारबंदी? वाचा काय म्हणाले पालकमंत्री सतेज पाटील

सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात लोकांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर सक्तीने कारवाई करावी. तसेच 28 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेवून रात्रीची संचारबंदी करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली. जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत आहे. यापार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, देशात आणि मराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात प्रत्येकी एक अशी कोरोना केअर सेंटर सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ऑक्‍सिजन पुरवठा कमी होवू नये यासाठी अनेक ठिकाणी त्याची तरतुद केली आहे. ती सुस्थिती आहेत का याची चौकशी करावी. तालुका पातळीवरील डॉक्‍टरांकडून माहिती घ्यावी, पण तपासण्या वाढवली पाहिजे. 1200 गावांमध्ये चाचण्या वाढल्या पाहिजेत. यामुळे आकडेवारी समजेल. पहिल्या फळीत काम करणाऱ्या 50 टक्के कर्मचाऱ्यांनी लसीकरण करुन घ्यावे. शुक्रवारपर्यंत सर्वांनी सक्तीने लसीकरण केले पाहिजे. अशा सूचना विभाग प्रमुखांना दिल्या आहेत. 

28 फेब्रुवारीपर्यंतची नियमावली तयार केली आहे. त्यानंतर कारवाई केली जाईल. मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे व हात धुण्याबाबत सक्ती केली पाहिजे. विनामास्क प्रवेश नाही, ही मोहिम नव्याने सुरुवात केली पाहिजे. दुकानात एखादी व्यक्ति विनामास्क आली तर त्याला मास्क घालतल्याशिवाय वस्तू देवू नये. लोकांनी स्वत:हून या मोहिमेत सहभागी होवून कोरोना संर्सग टाळला पाहिजे. घरात न राहता चाचणी करुन घ्यावी. चाचणी करणाऱ्यांनी तात्काळ चाचण्या करुन द्यावीत. 

राज्यात सहकारी संस्थांच्या निवडणूका होत आहेत. यासंदर्भात राज्य शासनासोबत चर्चा झाली आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूकांबाबत बुधवारी (ता. 24) होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय होवू शकतो. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar यांना पुण्यातील महिलेचा सल्ला, दादा बघा काय म्हणाले? | Pune News | Manohar Parrikar | Sakal News

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Mallikarjun Kharge: मणिपूर दौरा म्हणजे ढोंग व दिखावा; खचलेल्या लोकांचा अपमान केल्याचा खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर आरोप

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

SCROLL FOR NEXT