Satej Patil's challenge was accepted by the Mahadik group 
कोल्हापूर

सतेज पाटील यांचे आव्हान आम्ही स्वीकारले... तारीख, वेळ आणि ठिकाण कळवा...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - थेट पाईपलाईन योजनेसंदर्भात जाहीर चर्चा करण्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांचे आव्हान आम्ही स्वीकारत असून तारीख, वेळ आणि ठिकाण त्यांनी ठरवावे, आम्ही व्यासपीठावर येऊन चर्चा करायला तयार आहोत, असे आव्हान महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, नगरसेवक सुनील कदम यांनी पत्रकार परिषदेत दिले.

विजय सूर्यवंशी म्हणाले, ‘‘आमच्या नेत्यांनी थेट पाईपलाईन योजनेच्या बहुतांशी परवानग्‍या मिळवून दिल्या. आमदार अमल महाडिक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या पत्राच्या प्रतीच सूर्यवंशी यांनी दाखविल्या. थेट पाईपलाईनच्या डीपीआरमध्येच ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जादा बदल केला आहे. मंजूर योजनेपेक्षा योजनेची दिशाच बदलली आहे. त्यामुळे अत्यंत चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे. भाजप सरकारच्या काळात २०१४ ते २०१९ या योजनेचा निधी महापालिकेला मिळाला आहे. भाजप सरकारने यामध्ये राजकारण आणले नाही; मात्र विद्यमान सत्ताधीश यामध्ये राजकारण आणत आहेत.’’
सत्यजित कदम म्हणाले, ‘‘गृह राज्यमंत्री सतेज पाटील व त्यांचे बगलबच्चे आम्ही उपस्थित केलेल्या थेट पाईपलाईन योजनेच्या मूळ प्रश्‍नांना उत्तरे न देता वैयक्तिक आणि खासगी स्वरूपाची टीका करत आहेत. माजी खासदार धनंजय महाडिक यांचा रंकाळ्याजवळील कोणत्याही प्रकल्पात एकही दुकानगाळा नाही तरीही ते फाळा भरत नसल्याची टीका केली जात आहे; पण जर गाळा असेल आणि फाळा भरला नसेल, तर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी हा दुकानगाळा सील का केला नाही? मुळात योजनेच्या कामात मोठा घोळ आहे. एका जॅकवेलच्या कामात २५ कोटी वाढविले आहेत. सयाजी हॉटेलमधील सर्व गाळ्यांचा मालक वापर दाखवून पालिकेचे ४ ते ५ कोटीचे नुकसान केले आहे.’’ या वेळी आशिष ढवळे, किरण नकाते, ईश्‍वर परमार, राजसिंह शेळके उपस्थित होते.

जागा तुम्हीच लाटल्या

माजी महापौर सुनील कदम म्हणाले, ‘‘कदमवाडीतील दोन एकर जागा मी लाटली, असा त्यांचा आरोप आहे; पण कदमवाडीतील सर्व सरकारी जमीन डी. वाय. पाटील यांनीच लाटल्या आहेत. कदमवाडीत त्यांनी आम्ही घ्यायला जागाच ठेवल्या नाहीत. मैदानासाठीची २९ एकर जागाही त्यांनी घेतली. त्यामुळे वाल्याचा वाल्मीकी झाल्याचा आव आणणाऱ्या शारंगधर देशमुख यांनी आमच्यावर वैयक्तिक टीका करण्याचे थांबवावे. स्थायी सभापती असताना अमोल पोतदार प्रकरणात ते कारागृहात होते, एक कोटी भरून त्यांना जामीन मिळाला. गृहराज्यमंत्र्यांच्या ताटाखालचे मांजर होऊन त्यांचे अनेक प्रकार चालू असतात; सध्या पण एक प्रकरण चालू आहे. त्यामुळे त्यांनी मूळ थेट पाईपलाईन योजनेवर चर्चा करावी, वैयक्तिक टीकाटिपण्या करू नयेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT