कोल्हापूर

व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर दोन वर्षांनंतर समाधान

तात्पुरत्या कच्च्या रस्त्यामुळे ऐतिहासिक पन्हाळगड पर्यटकांनी बहरतोय

आनंद जगताप : सकाळ वृत्तसेवा

पन्हाळा : काही काळ कोरोनाने, तर काही काळ मुख्य रस्ता खचल्याने बंद असलेला ऐतिहासिक पन्हाळगड आता तात्पुरत्या कच्च्या रस्त्यामुळे हळूहळू बहरू लागला आहे. गाईड, छोटे-छोटे व्यावसायिक, हातगाडीवाले, बॅटरीवर चालणाऱ्या छोट्या मुलांच्या गाड्यावाले, घोडेस्वार, झुणका भाकरी विक्रेते या सर्वांच्याच चेहऱ्यावर तब्बल दोन वर्षांनंतर समाधान पसरू लागले आहे. ग्राहकांना हवे ते देण्यास त्यांचे हात हलू लागले आहेत.

जूनपासून सुरू असलेला पाऊस अद्यापही असल्याने गडाचा परिसर हिरवागार आहे. कधी हलकासा पाऊस, मध्येच ऊन, तर सायंकाळी थंडी असे तिन्ही ऋतूंतील वातावरण इथे असल्याने पर्यटकांची पावले पन्हाळगडाकडे वळू लागली आहेत. गडावर यायला मुख्य रस्ता नसला, तरी रेडेघाटीतून पर्यायी रस्ता केल्याने पर्यटकांची सोय झाली आहे. त्यांचा प्रवास निसर्गाच्या सान्निध्यातून होत असल्याने त्यांची कळी खुलत आहे, दुचाकीवरून येणाऱ्यांना मात्र मुख्य रस्त्यावरून प्रवेश दिला जात असल्याने ते विजयी मुद्रेने गडात प्रवेश करीत आहेत.

गडावरील तबकवन परिसरासह मार्तंड आणि रेडे घाट परिसरात नवनवीन पक्ष्यांचे आगमन झाले आहे. त्यांचा सुमधुर आवाज, मोरांचा केकारव, मार्तंड परिसरातील गव्यांचा कळप, तटबंदीखाली क्वचित दर्शन देणारे बिबटे, झाडाझाडांवरून उड्या मारणारी माकडे यामुळे येणारा पर्यटक भान हरपून निसर्गात रममाण होत आहे.

गडावर रोज साधारण दीड ते दोन हजार पर्यटक येत असून, शनिवारी, रविवारी आणि सुटीच्या दिवशी हाच आकडा चार हजारांवर जात आहे. साहजिकच नगर परिषदेला रोज किमान १० ते १५ हजार आणि सुटीच्या दिवशी ४० ते ५० हजार रुपयांचे उत्पन्न प्रवासी करांपासून मिळत आहे; तर वन खात्याला तबकवन उद्यानातील प्रवासी करापासून आठवड्याला आठ ते दहा हजारांचे उत्पन्न मिळत आहे. वाहनातून गडावरील ऐतिहासिक ठिकाणे पाहावयाची असतील तर छोटी लंडन बस, रेल्वे, जीप तसेच रिक्षासह चारचाकी वाहनांची सुविधा आहे.

पन्हाळगडावर यायला पर्यायी रस्ता झाल्याने पर्यटकांची संख्या हळूहळू वाढत आहे. साहजिकच, गेले तीन वर्षे व्यवसाय नसल्याने गाईड व्यावसायिकांची होणारी कुचंबणा आता थांबली असून, रोजच्या रोजीरोटीची सोय होत आहे. व्यावसायिकांनी घाई न करता पर्यटकांना योग्य आणि ऐतिहासिक माहिती पुरवून गडाचे नाव राखावे.

- राजू मुल्ला, गाईड

पन्हाळगडावर पर्यटकांची गर्दी वाढत असून, त्यांची मांसाहारी घरगुती जेवणाची मागणी जादा आहे. रस्त्याअभावी बरेच पर्यटक बुधवार पेठ, कदमवाडी, वाघबीळ परिसरातील खासगी बंगल्यात राहतात. गुरुवार पेठेत गाड्या लावून नाक्यापर्यंत चालत येऊन येथील थंड हवा चाखून घरगुती जेवणाची ऑर्डर देऊन जातात. त्यामुळे त्यांना वास्तव्याच्या ठिकाणी जेवण पुरवावे लागते.

- शकील मुतवल्ली, घरगुती मेसचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT