satra for panel restructure in gram panchayat election last date for withdrawing of application in kolhapur 
कोल्हापूर

उमेदवारांची निवड करुन आता पॅनेल बांधणीसाठी होणार कसरत ; अर्ज माघार घेण्याचा आज अंतिम दिवस

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांची मनधरणी आणि समजूत काढताना दमछाक होत आहे. आज अर्ज माघार घेण्याचा अंतिम दिवस आहे. गावागावांतील सहकारी सेवा संस्था, दूध संस्था, गावकारभाऱ्यांचे घर किंवा समाज मंदिरात इच्छुक उमेदवारांसोबत चर्चा करून पॅनेल बांधणी केली जात आहे.

एकाच गटात दोन-दोन पॅनेल नको, प्रश्‍न गटाचा आहे, भावकीचा आहे, असं म्हणत गावागावांतील गावकारभारी इच्छुकांना गटाकडून किंवा संस्थेकडून उमेदवारी का द्यावी, याची विचारणा करून उमेदवारांची निवड करून पॅनेल बांधणी करत आहेत.
जिल्ह्यात ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. १५ जानेवारीला मतदान होणार आहे. आज (४) दुपारी ३ पर्यंत अर्ज माघार घ्यायची वेळ आहे. त्यामुळे, रात्री उशिरापर्यंत कोण कोठून माघार घेणार, त्याचे नियोजन व पॅनेल बांधणीचे काम सुरू होते. ज्यांनी-ज्यांनी गावकारभाऱ्यांचे ऐकून माघार घेतली, त्यांचा त्याच वेळी सत्कार केला जात आहे. ज्यांनी माघार घेतली त्यांनीही जो उमेदवार निवडणूक रिंगणात आहे, त्याचा जोमाने प्रचार करा, अशा सूचनाही दिल्या जात आहेत.

ज्यांनी-ज्यांनी माघार घेण्याचे मान्य केले आहे ते सर्व आज सामुदायिकरीत्या माघार घेण्यासाठीच जाणार आहेत. गावकारभारी, सहकार समूह किंवा गटाने जो निर्णय घेतला, तो प्रमाण मानून कामाला लागावे, अशा सूचनाही दिल्या आहेत. जो समूहाच्या किंवा गटाच्या विरुद्ध जाईल, त्या उमेदवारासोबत प्रचाराला कोणीही फिरणार नाही, अशी शपथही घेण्यात आली आहे. 

सरपंचपद खुल्या प्रवर्गाकडे आहे, त्या ठिकाणी उमेदवारांची मोठी गर्दी आहे. यातून माघार घेण्यासाठी गावकारभाऱ्यांनाही रात्री उशिरापर्यंत समजूत काढावी लागली आहे. मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज आल्यामुळे नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी कटू निर्णय घ्यावे लागत आहेत. दरम्यान, उद्या माघारीनंतर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे चित्र 
स्पष्ट होणार आहे. 

दृष्टिक्षेपात धूमशान...

  •  निवडणूक असणाऱ्या ग्रामपंचायती : ४३३
  •  प्रभाग संख्या : १४९२  सदस्य संख्या : ४०२७
  •  मतदान केंद्रे : १७८१  मतदान : १५ जानेवारी
  •  मतमोजणी : १८ जानेवारी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : आता मंत्रालयात नाही तर शेतकऱ्याच्या बांधावर होणार शेतीची चर्चा; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सांगितला उत्पन्नाचा मंत्र!

Sunday Special Recipe: सुट्टीच्या दिवशी ट्राय करा घरगुती खास पुलाव, बनवायला अगदी सोपा

Pushkar Singh Dhami : वन्यजीव हल्ल्यांवर मुख्यमंत्र्यांचा अ‍ॅक्शन मोड; ३० मिनिटांपेक्षा उशीर झाला तर वनअधिकाऱ्यांवर कारवाई!

आजचे राशिभविष्य - 14 डिसेंबर 2025

Asia Cup Trophy Controversy : ‘ऑपरेशन’ आशिया करंडक

SCROLL FOR NEXT