Satyagraha against the discriminatory attitude towards the tank in the Ambabai temple premises
Satyagraha against the discriminatory attitude towards the tank in the Ambabai temple premises 
कोल्हापूर

सत्याग्रह, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातला ; 100 वर्षांपूर्वीच जातीयवादाला दिली मूठमाती

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - रामचंद्र बाबाजी जाधव तथा दासराम यांनी अंबाबाई मंदिराच्या आवारातील हौदाबाबत केल्या जाणाऱ्या भेदभावाच्या प्रवृत्तीविरोधात सत्याग्रह केला. १० ऑगस्ट १९१९ हीच ती तारीख. या घटनेला आज पुन्हा नव्याने उजाळा मिळाला.

निष्ठावंत, निर्भय आणि लढवय्ये सत्यशोधक म्हणून दासराम यांची ओळख. कोल्हापुरातील सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, सहकार, शैक्षणिक अशा सर्व चळवळीत त्यांचा पुढाकार असायचा. श्री शाहू सत्यशोधक समाजाचे ते अनेक वर्षे सचिव होते. त्यांचा काळ हा सत्यशोधक चळवळीचा धगधगता कालखंड होता. या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर परंपरावाद, धार्मिक सनातनी वृत्तीविरोधात वैचारिक आणि कृतिशील लढा सुरू होता आणि कोल्हापूर हे त्याचे केंद्र होते. गावोगावी जाऊन सत्यशोधक समाजाची शिकवण जनतेपर्यंत पोचवणे, व्याख्याने देणे, पुरोहित शाळा चालवणे, सहभोजने आयोजित करणे आदी उपक्रमांवर त्यांनी भर दिला होता. 

अंबाबाई मंदिरातील दोन हौदांपैकी एक पाण्याचा हौद फक्त ब्राह्मण समाजासाठी राखीव होता. त्याला स्पर्श करण्याचा अधिकार इतर समाजातील लोकांना नव्हता. हा अपमान धुऊन काढण्यासाठी दासरामांनी अगोदर जाहीर करून या हौदावर स्वतः सर्वांसमक्ष अंघोळ केली आणि उघड आव्हान दिले. त्यांना अटक केली गेली. मात्र, राजर्षी शाहूंच्या आदेशाने त्यांना मुक्त करण्यात आले आणि दासरामांच्या धाडसामुळे अखेर या हौदावरचे बंधन मोडले. हा हौद सर्वांसाठी खुला झाला. मंदिरातील त्रिपुरारी पौर्णिमेच्या महाप्रसादावेळी होणारा भेदभाव ही दासराम यांना खटकत होता. त्याविरोधातही त्यांनी टोकाची भूमिका घेतली होती.

दासरामांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी छोट्या छोट्या पुस्तिका लिहिल्या. स्वतः गर्दीत उभे राहून ते पुस्तिका विकत. दासराम प्रकाशनातर्फे भास्करराव जाधव, माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे आदी दिग्गजांचे साहित्य प्रकाशित केले. अंबाबाई मंदिरासमोरील चौकाचे नगरपालिकेने १९५३ साली ‘दासराम चौक’ असे नामकरण केले, तर पापाची तिकटी ते मटण मार्केट मार्गाला ‘दासराम रस्ता’ असे नाव दिले. मात्र, नव्या पिढीला त्याचा विसर पडला आहे. 
- प्रा. डॉ. छाया पोवार, शिवाजी पेठ
 

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT