scam in wrestling Kabaddi mat quality
scam in wrestling Kabaddi mat quality 
कोल्हापूर

असा झाला भ्रष्टाचाराचा भांडा फोड ; शासनाचीच केली तब्बल 16 लाखांची फसवणूक 

राजेश मोरे

कोल्हापूर - शिंगणापूर (ता. करवीर) येथील जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन आणि निवासी क्रीडा प्रशालेला पुरविण्यात आलेल्या कुस्ती, कबड्डी मॅटच्या गुणवत्तेबाबत चुकीच्या अहवालाद्वारे शासनाची सुमारे 16 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला. यात एका प्राचार्याचाही समावेश आहे. 

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे अशी, अलोक यादव (सनराईज इव्हेंट अँन्ड एक्‍झीबिशन, कोल्हापूर) आणि प्राचार्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन आणि निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर या शाळेत कुस्तीचे व कबड्डीचे मॅट खरेदी करण्याची निविदा मागविण्यात आली होती. ही निविदा कोल्हापुरातील सनराईज इव्हेंट ऍन्ड एक्‍झिबिशनचे अलोक यादव यांना प्राप्त झाली होती. निविदेप्रमाणे पुरवठा करण्यात येणाऱ्या साहित्याची शासकीय तपासणी करण्याची जबाबदारी कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्यांना देण्यात आली होती. हे साहित्य योग्य गुणवत्तेचे नसतानाही ती योग्यतेची आहे, असा चुकीचा अहवाल त्यांनी पाठविला. हा अहवाल योग्य समजून संबधित प्रशासनाने संबधित प्राचार्यांना मॅटसाठी 15 लाख 99 हजार 999 इतकी रक्कम दिली होती. यादव व प्राचार्य या दोघांनी निविदेप्रमाणे गुणवत्तापूर्ण मॅट नाही हे माहित असतानाही त्याचा पुरवठा करत शासनाची फसवणूक केली. हा प्रकार 5 मार्च 2019 ते 18 मार्च 2019 दरम्यान जिल्हा परिषद कार्यालय व संबधित शाळेत घडला. अशी फिर्याद शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री संजय जाधव यांनी शाहूपुरी पोलिसात दिली. त्यानुसार दोघा संशयितावर फसवणुकीचा दाखल झाला. 
 

सकाळ बातमीचा परिणाम... 

जिल्हा परिषदेने कुस्तीपट्टूंसाठी 16 लाखांच्या मॅटची खरेदी केली. मात्र ते निष्कृष्ठ दर्जाचे असल्याची तक्रार प्रशिक्षकांनीच जिल्हा परिषदेकडे केली. याला दैनिक "सकाळ'ने वृत्त मालिकेतून वाचा फोडली. याबाबत वारंवार पाठपुरावा केला. त्याची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशी समिती नेमली. या समितीत एका राष्ट्रीय कब्बड्डीपट्टूसह पाच जणांचा समावेश होता.

समितीने संबधित शाळांना भेट देऊन मॅटची गुणवत्ता तपासली. त्यात समितीने गुणवत्तेबाबत अक्षेप नोंदविण्यात उपस्थित केले होते. त्याचा अहवालही त्यांनी जिल्हा परिषदेकडे सादर केला होता. पण हा अहवालही अनेक महिने दडपून ठेवण्याचा प्रयत्न झाला. जिल्हा परिषदेच्या सभेत पै. विजय बोरगे यांनी हे प्रकरण लावून धरले. तसेच उपोषणाचाही इशारा दिला होता. याबाबतही "सकाळ'ने आपला पाठपुरावा केला होता. अखेरीस आज मॅटच्या गुणवत्तेतील त्रुटीबाबत प्रशासनाकडून दोघांवर 15 लाख 99 हजार 999 रुपयाची शासनाची फसवणूक केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली. 

 संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठा मदतनीसाला राजस्थानमधून अटक

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Sachin Tendulkar: सचिनच्या घरातून सिमेंट मिक्सरचा आवाज, शेजाऱ्याच्या तक्रारीनंतर आला फोन कॉल; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT