The scared English paper
The scared English paper 
कोल्हापूर

धाकधुकीत गेला इंग्रजीचा पेपर 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : मनात धाकधूक घेऊन बारावी परीक्षेला विद्यार्थी आज सामोरे गेले. इंग्रजीचा पेपर झाल्यानंतर कसून अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले. "पेपर सोपा होता,' अशा प्रतिक्रिया बहुतांशी विद्यार्थ्यांतून व्यक्त झाल्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावी (एचएससी) परीक्षेस आज प्रारंभ झाला. कोल्हापूर विभागात 162 केंद्रांवर परीक्षेची बैठक व्यवस्था केली आहे. 

इंग्रजीचा पहिला पेपर असल्याने विद्यार्थ्यांनी 10 वाजताच केंद्रांवर हजेरी लावली. एकमेकांना "बेस्ट ऑफ लक' अशा शुभेच्छा देत त्यांचे चेहरे नोट्‌स पाहण्यात व्यस्त होते. पालक वर्ग पाल्याने हॉल तिकीट, पेन, पेन्सिल, पट्टी, पॅड सोबत घेतले आहे का?, याची विचारणा करत होते तर केंद्रातील कोणत्या खोलीत नंबर पडलाय, याची माहिती घेण्यासाठी फलकावर विद्यार्थ्यांची गर्दी होती. पोलिस यंत्रणेने केंद्राच्या परिसरात गोंधळ होऊ नये, याची दक्षता घेतली. केंद्राबाहेर थांबलेल्या पालक वर्गाला तेथून अन्य ठिकाणी जाण्याच्या सूचना केल्या. 

संवेदनशील केंद्रांवर भरारी पथकाने भेटी देऊन वर्गात जाऊन पाहणी केली. पेपर सुटल्यानंतर बहुतांशी विद्यार्थ्यांनी पेपर सोपा होता, अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पालक वर्गाने विद्यार्थ्यांना पेपर कसा गेला, अशी विचारणा केली. 

चार विद्यार्थी पकडले 
कोल्हापूर जिल्ह्यातील कोतोली व गारगोटीत प्रत्येकी एक, तर सांगली जिल्ह्यात कॉपी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना असे चार विद्यार्थी कॉफी करताना भरारी पथकाने पकडले. 

28 पानी उत्तरपत्रिका, पॅडची गरज नाही 
ट्रान्स्फरन्ट (पारदर्शक) पॅड वर्गात नेण्यास काही केंद्रांवर मज्जाव केल्याची तक्रार पालकांतून झाली. दरम्यान, असे पॅड नेण्यास कोणतीही हरकत नसल्याचे विभागीय मंडळाचे सचिव सुरेश आवारी यांनी सांगितले. कॉपीसंबंधी आपेक्षार्ह काही असेल तर अशा गोष्टींना परीक्षा केंद्रात नेण्यास मज्जाव आहे. ट्रान्स्फरन्ट पॅडचा वापर हा उत्तर पत्रिकेला आधार म्हणून केला जातो. मात्र, उत्तरपत्रिका ही अठ्ठावीस पानांची असल्याने या पॅडची गरज नाही. तरीही काही विद्यार्थ्यांना त्याची गरज असल्यास त्यांना ते वर्गात नेण्यास परवानगी द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पोशाखाची सक्ती नाही.. 
राज्य मंडळाने यंदापासून बूट, बेल्ट, चप्पलही वर्गात नेण्यास मनाई केली आहे. परीक्षेसाठी त्या त्या महाविद्यालयाचा ड्रेसकोड बंधनकारक नाही. तरीही विद्यार्थी संबंधित महाविद्यालयाचा ड्रेसकोड परिधान करून परीक्षा देतात. एका कनिष्ठ महाविद्यालयाने ड्रेसकोडची गरज काय?, असा आक्षेप घेतला. ड्रेसकोड ही संबंधित महाविद्यालयाची अंतर्गत बाब आहे. त्यामुळे त्यास सक्ती करू शकत नसल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT