The school of birds fills the courtyard of the house 
कोल्हापूर

घराच्या अंगणात भरते पक्ष्यांची शाळा 

बी. डी. चेचर : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर ः पर्यावरणाच्या सान्निध्यात असलेल्या आर. के. नगर येथील नसरिन अल्ताफ हुसेन उस्ताद यांच्या घराच्या अंगणात वर्षभर वेगवेगळ्या पक्ष्यांची जणू शाळाच भरते. त्याचे कारण म्हणजे त्या रोज अंगणात येणाऱ्या पक्ष्यांसाठी धान्य टाकतात. त्यामुळे वर्षानुवर्षे सुरू असलेल्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने घरांचे अंगण अधिकच आनंदी बनत आहे. 

त्यांच्या अंगणात वेगवेगळ्या 8 प्रकारच्या चिमण्या, भारद्वाज, हॉर्नबिल, सुतारपक्षी, साळुंखी, लालबुड्या, चष्मेवाला यासह इतर पक्षी येतात. सकाळी ठरलेल्या वेळी धान्य टाकताना तर हे पक्षी एकत्र जमतात. त्यावेळी अंगणातील पक्षी पाहून नसरिन यांच्यासह कुटुंबीयांच्या डोळ्यांचे पारणे फिटतात. या सर्व पक्ष्यांना नसरिन यांचा जिव्हाळा लागला असून दररोज धान्य व पाणी पिण्यासाठी हा गोतावळा हजर असतो. या पक्ष्यांना दररोज किमान एक किलो तांदूळ घालावे लागतात आणि ते न चुकता त्या पक्ष्यांना खावू घालतात. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून त्यांनाही आनंद मिळतो. 
निसर्गाशी माणसाचे नाते खूप पक्के आहे; परंतु आधुनिक युगात हे नाते काहीसे डळमळीत होत असताना नसरिन यांचा हा नित्यपाठ अनेकांना प्रेरणा देणारा आहे. दररोज येणाऱ्या पक्ष्यांच्या जवळ गेल्यानंतरही ते पक्षी आपल्याच नादात असतात. नसरिन जवळ गेल्या तरी ते पक्षी उडून जात नाहीत. 
.. 
आपल्या दाराघरात येणाऱ्या मुक्‍या जीवांसाठी खायला धान्य व प्यायला थोडेसे पाणी ठेवावे, हे आपले पूर्वज सांगतात. हाच सल्ला मी आचरणात आणते. या पक्ष्यांना खायला देऊन मी निसर्गाशी आपले नाते दृढ करते. त्यांच्या किलबिलाटाने खूप आनंद मिळतो. 
नसरिन उस्ताद ​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

El Nino Impact on Rabi Crops : एल निनोचा विळखा! रब्बी हंगामात अन्नधान्य उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता; कृषी सचिवांनी व्यक्त केली चिंता

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापुरात बिबट्याची दहशत! थेट फुलेवाडी-लक्षतीर्थ मार्गावर झेप घेत उसाच्या शेतात शिरला, मानवी वस्तीत भीतीचं वातावरण; वन विभाग-पोलिस यंत्रणा सतर्क

IIT Bombay Case: कॉपी केल्याचा साहिलला पश्चात्ताप, मित्र-मैत्रिणीला फोन केल्याचे पोलिस तपासात उघड

Marathi News Live Updates: ठाकरे बंधूंची आज शिवतीर्थावर पत्रकार परिषद; एसआयआर प्रक्रियेसह निवडणूक आयोगाच्या मुद्द्यांवर भूमिका मांडणार

ढिंग टांग : आत्ता होता, गेला कुठे..?

SCROLL FOR NEXT