School Closed, Private Tuition Start In Gadhinglaj Area 
कोल्हापूर

शाळा बंद, खासगी शिकवणी सुरू

अवधूत पाटील

गडहिंग्लज : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या. पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा अवलंब करण्यात आला आहे; मात्र विविध कारणांनी हा पर्यायही अडचणीचा ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी घरातूनही म्हणावी तितकी सजगता दिसून येत नाही. या साऱ्याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांना खासगी शिकवण्यांना धाडले जात आहे. त्यामुळे खासगी शिकवण्या आणि त्याला पसंती देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. 

गत शैक्षणिक वर्षाला अखेरच्या टप्प्यात कोरोनाने गाठले. या जीवघेण्या विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे मार्ग अवलंबण्यात आले. त्यानुसार शाळा बंद करण्याला पहिले प्राधान्य देण्यात आले. नव्या वर्षातही कोरोनाच्या प्रादुर्भावाने पाठ सोडलेली नाही. त्यामुळे अद्यापही शाळांचे दरवाजे बंदच आहेत; पण शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईनचा पर्याय अवलंबला आहे; मात्र पालकांकडे ऍन्ड्रॉईड मोबाईलचा अभाव, मोबाईल नेटवर्कची अडचण, वापराबाबत अज्ञान या आणि अशा विविध कारणांनी ऑनलाईन शिक्षणात अडचणी येत आहेत. 

अनेक कुटुंबांमध्ये म्हणावे तितके शैक्षणिक वातावरण नाही. शिक्षकांकडून ऑनलाईन अभ्यासक्रम पाठविला तरी तो पूर्ण केला जातोच असे नाही. त्यासाठी पालकांकडून पाठपुरावा होताना दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकडूनही अभ्यासाला दाद दिली जात नसल्याचे चित्र आहे. पूर्वी विद्यार्थी आठ ते दहा तास शाळेमध्ये असायचा. त्यामुळे पालकांनाही त्याच्या शैक्षणिक प्रगतीची फारशी चिंता नव्हती; पण यंदा परिस्थिती वेगळी आहे. 

परिणामी, काही पालकांकडून आपल्या पाल्यांना खासगी शिकवणींना धाडले जात आहे. शहरात खासगी शिकवण्या सुरू आहेतच; पण अनेक गावांतही एखाद-दुसऱ्या ठिकाणी अशा शिकवण्या घेतल्या जात आहेत. सुशिक्षित बेरोजगार असलेल्यांकडून या शिकवण्या घेतल्या जात आहेत. नियमित शिकवणीसह शाळेतून पाठविलेला अभ्यासही विद्यार्थ्यांकडून करून घेतला जात आहे. त्यातून त्यांनाही उदरनिर्वाहासाठी काही रक्कम मिळत आहे. कोरोनासारख्या अडचणीच्या काळात कुटुंब चालविण्यासाठी या रकमेचा हातभार लागत आहे. 

सुरक्षेकडेही लक्ष हवे... 
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी म्हणून शाळांचे कामकाज बंद ठेवण्यात आले. अशा परिस्थितीत आपल्या पाल्याला खासगी शिकवणीसाठी पाठवायचे की, नाही हा ज्या त्या पालकांचा प्रश्‍न आहे; पण कोरोना प्रादुर्भावाच्या काळात विद्यार्थ्यांची सुरक्षाही महत्त्वाची आहे. खासगी शिकवणी घेणाऱ्यांकडून त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 5 दिवसांतच 1 लाखाचे झाले 3 लाख! 300% रिटर्न देणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Ganeshotsav 2026: हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी का? पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? | Ganesh Chaturthi 2026

SCROLL FOR NEXT