The School Got The Road With The Initiative Of The Officer Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

प्रांताधिकाऱ्यांच्या पुढाकाराने शाळेला मिळाला रस्ता

सुनील कोंडुसकर

चंदगड : तालुक्‍याच्या शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तेच्या जोरावर नावलौकिक पावलेल्या नागनवाडी येथील संजय गांधी विद्यालयाकडे जाण्यासाठी रस्त्याचा प्रश्‍न क्‍लिष्ट बनला होता, परंतु प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी या प्रश्‍नात लक्ष घालून रीतसर रस्ता तयार करून दिला. 

शिक्षकी पेशात सेवाभावी वृत्ती जोपासणारे शिक्षक आणि त्यांच्या आज्ञेत वागणारे विद्यार्थी यामुळे गेली काही वर्ष शाळेच्या गुणवत्तेचा आलेख उंचावत आहे. दहावीच्या परीक्षेत याचे प्रतिबिंब पाहायला मिळते, मात्र शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवनाची वाटाडी असलेल्या या शाळेकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता. सामाजिक कार्यकर्ते ऍड. संतोष मळवीकर यांना ही बाब खटकली. त्यांनी प्रांताधिकारी पांगारकर यांच्या निदर्शनास आणले. त्यांनीही याची दखल घेत राजश्री पचंडी यांची या कामी नियुक्ती केली.

रस्त्यासाठी ज्यांची जमीन घेण्यात येणार होती ते मारुती मिसाळ, दत्तात्रय धामणेकर, बिर्जे, झिलू गावडे, रमेश गावडे, सुरेश गावडे, सत्तार, बाबू गावडे यांना विश्‍वासात घेण्यात आले. त्यांनीही सहकार्याचा हात पुढे केला. त्यामुळे शाळेकडे जाणारा 8 फूट रुंद व 120 फूट लांबीचा रस्ता तयार झाला.

तहसीलदार विनोद रणावरे, मंडल अधिकारी बापूसो देसाई, तलाठी सुधाकर देसाई, उपसरपंच रवींद्र बांदिवडेकर, सदस्य लहू गावडे यांच्या उपस्थितीत हा रस्ता करण्यात आला. प्रा. रमेश गावडे, मुख्याध्यापक भोगूलकर व इतर शिक्षकांचे सहकार्य लाभले. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Athletics Championships: नीरज-अर्शदकडून निराशा, पण भारताच्या सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं; जाणून कोण ठरलं विजेता

Agriculture News : 'शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्त'; कांदा उत्पादकांकडून थेट सरकारला जाब

Nandgaon Municipal Election : ४ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीला कंटाळले; नांदगावकर निवडणुकीच्या प्रतीक्षेत

Pachod News : संजय कोहकडे मृत्यू प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालानंतर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होणार

Latest Maharashtra News Updates : तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन संजय शिरसाठ यांची हकालपट्टी करा, तृतीयपंथी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT