School quarterly exams this year from home  
कोल्हापूर

शाळांच्या तिमाही परीक्षा  यंदा घरातूनच...! 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा अजूनही शाळा बंदच आहेत. पुढील आदेश येईपर्यंत तीस सप्टेंबरपर्यंत शाळा बंदच राहणार असून दरम्यान होणाऱ्या तिमाही परीक्षा आता घरातूनच घेण्याचा निर्णय शाळांनी घेतला आहे. प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी इयत्तानिहाय व्हॉटस्‌ ऍप ग्रुप तयार केले असून त्या माध्यमातून रोजचा अभ्यास पाठवला जातो. याच ग्रुपच्या माध्यमातून आता पेपरही पाठवले जाणार असून, पुढील आठवड्यापासून तिमाही परीक्षांचे वेळापत्रक निश्‍चित केले आहे. दिलेल्या विशिष्ट वेळेत घरीच पेपर सोडवून त्याची फाईल विद्यार्थ्यांनी तयार करावी, अशा सूचना शाळांनी दिल्या आहेत. 
नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर साधारणपणे 15 ऑगस्टनंतर तिमाही परीक्षांना प्रारंभ होतो. मात्र, यंदा शाळाच बंद असल्याने या परीक्षा घरातूनच घेतल्या जाणार आहेत. शाळेत ज्या पद्धतीने परीक्षा घेतल्या जातात त्याच पद्धतीने या परीक्षेची रचना असून विशिष्ट गुणांचे पेपर विशिष्ट वेळेत पालकांनी विद्यार्थ्यांकडून सोडवून घ्यायचे आहेत. पेपर सोडवल्यानंतर त्याची फाईल तयार करून ती शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत जमा करायची आहे. 
बहुतांश शाळांत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अगोदरपासूनच ऑनलाईन अभ्यासाला प्रारंभ झाला. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या तिमाही परीक्षा पूर्ण झाल्या असून, आता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. 
ऑनलाईन पद्धतीने रोजचा अभ्यास पाठवला जात असला तरी त्याची उजळणी म्हणून या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यानिमित्ताने आवश्‍यक सर्व नोंदी शाळा करून ठेवणार आहेत. कोणत्याही परीक्षेशिवाय गुण देण्यापेक्षा घरातून का असेना, पण विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी आणि त्या माध्यमातून त्यांचे कुठलेही नुकसान होऊ नये, हा परीक्षेमागील शाळांचा उद्देश आहे. त्याशिवाय शासनाने भविष्यात अंतर्गत गुणांबाबत काही सूचना दिल्यास या परीक्षांच्या आधारे गुण देणे शाळांना सहजशक्‍य होणार आहे. 

पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी इयत्तानिहाय पालकांचे व्हॉटस्‌ ऍप ग्रुप तयार केले आहेत. त्या माध्यमातून सध्या रोजचा अभ्यास पाठवला जातो. 14 ते 19 सप्टेंबरदरम्यान तिमाही परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. 
- एम. आर. गोरे, मुख्याध्यापक, प्रायव्हेट हायस्कूल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यास तयार, पण...''; ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा निर्णय

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Army Success Story: कष्टाच्या जाेरावर भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी अभिषेक बिडकर; १३ लाख विद्यार्थ्यांमधून यशाला गवसणी, आई-वडिलांच्या डाेळ्यात पाणी!

Maharashtra Kesari: मानाच्या गदेसाठी हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड लढणार; जय पाटील, सिकंदर शेख पराभूत

Baramati News: कृषी फीडरवरील वीजपुरवठा सलग पाच दिवस खंडित; ग्रामीण भागात संताप

SCROLL FOR NEXT