शाळा sakal media
कोल्हापूर

कोल्हापूर - जिल्ह्यातील शाळा मंगळवारपासून सुरू होणार

कोरोना नियमांचे पालन करत शाळा सुरु कराव्या - जिल्हाधिकारी

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर - कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे राज्यसरकारने सुरु झालेल्या शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले होते. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होत आहेत. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा मात्र २५ जानेवारी म्हणजेच मंगळवारपासून सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बैठकीत दिले आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी यासंदर्भात आज घोषणा केली आहे.

राज्यातील कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर चार ऑक्टोबरपासून शाळा, महाविद्यालये सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली होती. मात्र मागील काही दिवसांपासून कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्या पाहता जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार दहा जानेवारीपासून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरू होते. मात्र, शिक्षक व पालकांकडून जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याची मागणी होत होती. अनेक शिक्षक संघटनांनी शाळा बंदला विरोध दर्शवला होता. या मागणी मान्य करत जिल्ह्यातील शाळा मंगळवारपासून सुरु करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान कोल्हापुरात एकूण महापालिकेच्या 58 शाळा असून याद्वारे 10 हजार 200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

कोरोना नियमांचे पालन करत शाळा सुरु कराव्या असेही त्यांनी या बैठकीत सांगितले आहे. शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात यावी, कोरोना रुग्ण जास्त असेल त्याठिकाणी शाळा सुरू करताना विद्यार्थी सुरक्षेचा विचार करावा, कमी पटाच्या शाळा शंभर टक्के सुरू करता येतील, जास्त पटसंख्या असलेल्या शाळा शिफ्टमध्ये चालवाव्यात, शाळा सुरू करताना शाळा स्वच्छता, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे, अशा सूचना बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मात्र, महाविद्यालये सुरू करण्याबाबत अद्याप शासनस्तरावरून निर्णय झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

SCROLL FOR NEXT