Schools, hostels will be taken over 
कोल्हापूर

शाळा, वसतिगृहे ताब्यात घेणार 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : कोव्हिड विषाणूचा संभाव्य धोका पाहता महापालिकेने नियोजनाच्या स्तरावर महापालिकेने तयारी सुरू केली आहे. बोर्डिंग ताब्यात घेतली असून प्रसंगी शाळा, वसतिगृहे, मंगल कार्यालयांत व्यवस्था केली जाणार आहे. कोरोना रुग्ण अथवा लक्षणे आढळून आल्यास त्यासाठी पाचशे बेडची तयारी प्रशासनाने केली आहे. 

लॉकडाऊन शिथिलता आल्यानंतर रुग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता गृहीत धरून तयारी सुरू झाली आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची जबाबदारी प्रभाग समितीवर असणार आहे. नगरसेवकांसह अन्य सदस्यांचा यात समावेश असेल. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला होम क्वारंटाईन करायचे की इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करायचे याचा अधिकार समितीला असणार आहे.

ज्या भागात दाटीवाटीची वस्ती आहे, तेथे परजिल्ह्यातून कुणी माघारी परतला तर इन्स्टिट्यूशनला क्वारंटाईन केले जाईल. महापालिकेच्या शाळात व्यवस्था केली जाणार आहे. कोरोना रुग्णांची, त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांची संख्या वाढल्यास संबंधितांना क्वारंटाईन केले जाणार आहे. संभाव्य तीस ते चाळीस हजार रुग्णांची संख्या गृहीत धरून नियोजन सुरू आहे. 

पाचशे बेडसाठी पहिल्यांदा विविध बोडिग ताब्यात घेतली जाणार आहेत. नंतर महापालिका शाळा तसेच गरज पडल्यास खासगी शाळा तसेच वसतिगृहे ताब्यात घेतली जाणार आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतर मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरणार आहेत. यातील एकाला जरी कोरोनाची लक्षणे दिसल्यास परिस्थिती गंभीर होणार आहे. परजिल्ह्यातून शहरात नेमके किती लोक येणा याचा आकडा अद्याप निश्‍चित झालेला नाही. 

बाहेरच्यांवर क्वारंटाई शिक्का 
बाहेरून येणाऱ्यांवर क्वारंटाईचा शिक्का मारला जाईल. होम अथवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करून त्यांच्यावर 14 दिवस नियंत्रण ठेवले जाईल. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू लागल्यानंतर महापालिकेने घरोघरी सर्व्हे करून लोकांची माहिती घेतली आहे. दुसऱ्या टप्प्यात कोरोनाच्या उपाययोजंसोबत क्वारंटाईनची व्यवस्था केली जाणार आहे. कोरोना रुग्ण अथवा क्वारंनटाईन रुग्णाला ठेवायचे म्हंटले की लोकांचा विरोध होतो. स्थानिक नगरसेवकांचे लोक ऐकतात. त्यामुळे नागरी वस्तीची काळजी घेऊन शाळाशाळांतून व्यवस्था करावी लागणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT