Schools in Kagal will get books 
कोल्हापूर

कागल तालुक्‍यात शाळांना आज मिळणार पुस्तके 

नरेंद्र बोते

कागल : मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत दिली जाणारी पुस्तके केंद्रस्तरावर पोहोच केली आहेत. शाळांना उद्या (ता. 15) पाठ्यपुस्तके मिळतील, असे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गटशिक्षण अधिकारी डॉ. जी. बी. कमळकर यांनी दिली. 

राज्य शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत दिली जाणारी पुस्तके कागल तालुक्‍यात पोहोच झाली आहेत. एकूण मागणी पैकी 80 टक्के पुस्तके तालुक्‍याला प्राप्त झाली आहेत. कागल तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाकडून शाळांना पुस्तके पोहोच करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. 

शाळा सुरु करण्याबाबत चर्चा सुरु असून अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांच्यात बैठक झाल्यानंतर पुढील निर्णय अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समित्या संभ्रमात आहेत. ठोस निर्णय होऊन तारीख निश्‍चित होइपर्यंत संभ्रमाची स्थिती राहणार आहे. मात्र, तरीही शासनाने पाठ्यपुस्तके वेळेत देण्याची तत्परता दाखविली आहे.

आता विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोच करण्याचे काम सुरू आहे. पुस्तके मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळणारा आनंद वेगळाच असतो. शिवाय शाळा सुरू नसल्यातरी पुस्तके मिळाल्यानंतर विद्यार्थी पालकांच्या मदतीने पुस्तकातील काही भाग स्वयंअध्ययनाद्वारे शिकू शकतील. 

27 हजारावर विद्यार्थ्यांना पुस्तके 
तालुक्‍यात 27 हजार 683 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. यामध्ये पहिलीसाठी तीन हजार 68, दुसरीसाठी तीन हजार 289, तिसरीसाठी 3 हजार 289, चौथीसाठी 3 हजार 223, पाचवीसाठी 3 हजार 514 , सहावीसाठी 3 हजार 674, सातवीसाठी 3 हजार 643, आठवीसाठी 3 हजार 783 अशा एकूण 27 हजार 683 विद्यार्थांना पुस्तके मिळणार आहेत. 

दृष्टिक्षेप 
- कागल तालुक्‍यातील केंद्र स्तरावर पुस्तके पोच 
- मागणी पैकी 80 टक्के पुस्तके उपलब्ध 
- शाळा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू 
- विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोच करण्याचे काम सुरू 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Connection Rules : ...तर 'या' ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

New Marathi Book : मराठी भाषेच्या वर्तमानावर डॉ. सुधीर रसाळ यांचे परखड चिंतन

Virgo Horoscope : कन्या राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): मेहनतीचे फळ मिळणार; करिअरमध्ये मोठी उलथापालथ, घरी पैसा येणार

Leo Horoscope : सिंह राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): या आठवड्यात भाग्य तुमच्या पायाशी; धनलाभ योग, स्पर्धा परीक्षेत यश मिळणार

Cancer Horoscope : कर्क राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): सुरुवात कठीण, पण शेवट गाजणार; धनलाभ होईल अन् कामाच्या ठिकाणी मोठी कलाटणी

SCROLL FOR NEXT