The scythe was applied to the neck 
कोल्हापूर

गळ्याला लावला कोयता अन््

विके दिंडे

पेठवडगाव ः कोयत्याचा धाक दाखवून वृद्धेचे 1 लाख 11 हजारांचे दागिने हिसकावून गेतले. ही घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी रावण पाटील (रा. भादोले) यास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तीस हजारांचे सोन्याची माळ, 37 हजारांचे डोर्ले, 37 हजाराचे गंठण, सहा हजारांच्या पाटल्या हस्तगत केल्या आहेत. याबाबत इंदुबाई तुकाराम पाटील (वय 80) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी, इंदुबाई यांना दोन मुले आहेत; परंतु त्या पतीसह जोगणी माळ येथे राहतात. दरम्यान रविवारी सायंकाळी रावण पाटील याने फिर्यादीचा मुलगा दादासो याचे भांडण झाले असून त्याच्या डोकीला मार लागल्याची बतावणी केली. इंदुबाई यांना मोटारसायकलवर घेऊन तो शिगावच्या बाजूला गेला. एका निर्जन ठिकाणी इंदुबाई यांचा गळा आवळून त्यांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने काढून घेतले. तसेच कोयत्याचा दाक दाखवून कुणाला सांगितलेस तर तुला व मालकाला जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी देऊन वृद्धेला तेथेच सोडून पळून गेला. यानंतर ही वृद्धा दुसऱ्याच्या मोटारसायकलवरून घरी पोचली व झाला प्रकार घरच्यांना सांगितला. यानंतर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. रावण पाटील गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत पेठवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलिस नाईक विनोद कुरणे, कॉन्स्टेबल दादा माने, संदीप गायकवाड तपास करीत आहेत. कोल्हापूर कोल्हापूर 

संपादन ः रंगराव हिर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! केवायसीनंतर अनेक ‘लाडक्या बहिणी’ अपात्र; गोरगरीब महिलांना लाभापासून वंचित राहण्याची वेळ, शासन करतय काय?

अग्रलेख - विवेकी स्वर लोपला

आजचे राशिभविष्य - 09 जानेवारी 2026

Egg Paratha Recipe: ब्रेकफास्टसाठी हेल्दी काहीतरी खास हवंय? 15 मिनिटांत तयार होणारा ‘अंडा पराठा’ ट्राय करा

३० लाख लाडक्या बहिणी चिंतेत! ‘ई-केवायसी’ची मुदत संपली, आता लाभ बंद होणार; १ एप्रिलपासून ‘या’ लाडक्या बहिणींनाच दरमहा मिळणार लाभ

SCROLL FOR NEXT