Search begins for robbers of nine artists from Rachannawadi crime marathi news 
कोल्हापूर

नऊ कलाकारांना लुटणाऱ्यांचा शोध सुरू:  कलाकारांची प्रकृती स्थिर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जेवणात गुंगीचे औषध घालून राचन्नावाडी (ता. चाकूर, जि. लातूर) येथील नऊ कलाकारांना लुटणाऱ्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, गुंगीचे औषध घातलेल्या कलाकारांची प्रकृती स्थिर आहे. जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. लुटारूने सर्वांची मिळून सुमारे दीड लाखाची लूट केली असावी, तसेच गुंगीसाठी धोत्र्याच्या बियांचा वापर केला असावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

गुंगीचे औषध घालून लूट; संशयितांचा शोध सुरू 

संशयिताने मंगळवारी रात्री लातूरहून नऊ कलाकारांना गाण्याच्या कार्यक्रमासाठी कोल्हापुरात बोलवून घेतले. गंजी गल्लीतील एका यात्री निवासमध्ये उतरवले. येथे जेवणातून औषध घालून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोकड लुटून नेली. त्यानंतर नऊ कलाकारांना सीपीआरमध्ये दाखल केले. त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. सर्वांचे जबाब नोंदविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. त्यातून लुटारूने दीड लाखाचा ऐवज लुटल्याची शक्‍यता आहे. त्याचा शोध तीन पथकांद्वारे सुरू आहे. जेवणात नेमके कोणते औषध घातले, हे शोधण्यासाठी रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT