The season of 300 badminton players in the kolhapur district wasted 
कोल्हापूर

जिल्ह्यातील तीनशेंवर बॅडमिंटन खेळाडूंचा हंगाम वाया 

सुयोग घाटगे

कोल्हापूर  : कोरोनाचा वाढता प्रभाव आणि लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील 300 वर बॅडमिंटन खेळाडूंचे भवितव्य अधांतरी राहिले आहे. जिल्हा स्पर्धा आणि राज्य स्पर्धां अनिश्‍चित असल्यामुळे खेळाडूंची पुढची वाट खडतर झाली आहे. ऐन हंगाम निघून जात असल्यामुळे अनेक खेळाडूंचे नुकसान होणार आहे. 
कोरोनाने जगाला घेरले आहे. काही देशांत खेळासाठी वेगळी आचारसंहिता बनवून स्पर्धाना प्रारंभ केला आहे, मात्र राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे येथील स्पर्धांच्या वर अनिश्‍चिततेचे सावट आहे. स्पर्धा बंद असण्याचा फटका सांघिक खेळांसह वैयक्तिक खेळांना बसत आहे. इनडोअर गेम असणारा बॅडमिंटन खेळ यामुळे प्रभावित झाला आहे. यामुळे जिल्ह्यात 500 हून अधिक खेळाडू तर स्पर्धात्मक पातळीवर खेळणाऱ्या 300 खेळाडूंचे भवितव्य प्रभावित झाले आहे. बंद असणाऱ्या सरावामुळे खेळाडूंच्या खेळावर परिणाम होत आहे. कोल्हापूर हे बॅडमिंटन खेळासाठी पोषक समजले जाते. येथे वर्षभरात विविध स्पर्धा होतात, मात्र सर्वाधिक महत्त्वाची जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आयोजित जिल्हा स्पर्धा आणि सेव्हन मॉर्निंग ग्रुपची राज्य स्पर्धा अनिश्‍चित आहेत. 

मार्गदर्शक तत्त्वांचे पालन शक्‍य 
या खेळात सोशल डिस्टंसिंग राखणे शक्‍य आहे. दोन खेळाडूंमधील अंतरदेखील जास्त असते. असे असल्यामुळे शासनाने याबाबत मार्गदर्शक तत्त्वे दिल्यास त्याचे काटेकोर पालन करणे शक्‍य आहे. 


सरावासाठी उपलब्ध नसणारे कोर्ट यामुळे खेळाडूंचे मोठे नुकसान होत आहे. स्पर्धा होत नसल्या तरीही सतत सरावामध्ये असल्याखेरीज कामगिरीमधील सातत्य राखणे कठीण जात आहे. 
- विनोद भोसले, संचालक, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

कोण आहे झी मराठीच्या 'सनई चौघडे' मालिकेत दिसणारी नायिका? ५ वर्षानंतर केलंय पुनरागमन, म्हणते-

नवी मुंबईत गॅस वितरण ठप्प, 1500हून अधिक कमर्शियल सिलिंडर पुरवठा बंद; हॉटेल व्यावसायिक अडचणीत

IPL 2026 Marathi News : राजस्थान रॉयल्सची साथ सोडली कारण... ! संजू सॅमसननं मन मोकळं केलं; म्हणाला, त्यांच्याविरुद्ध खेळताना भावना...

SCROLL FOR NEXT