second round of eleventh entry from 14 December 
कोल्हापूर

अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी 14 डिसेंबरपासून  

संदीप खांडेकर

कोल्हापूर : अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी 14 डिसेंबरपासून सुरू होत असून, 21 ते 23 डिसेंबर दरम्यान निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्याबाबतची माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने पत्रकाद्वारे दिली आहे.

दुसरी फेरी अशी : 14 ते 16 डिसेंबर - ज्या विद्यार्थ्यांना अर्जात बदल करायचा आहे. त्यांनी पूर्वीचा अर्ज संकेतस्थळावर लॉगिन करून रद्द करावा व नवीन अर्ज प्रक्रिया सुरेखासह भरावा. ज्यांना अद्यापही रजिस्टर भाग एक व भाग दोन भरला नाही. त्यांनी ऑनलाईन अर्ज नव्याने भरावा. ज्यांना अर्ज रिजेक्टचा मेसेज आला असेल. त्या विद्यार्थ्यांनी त्रुटींची पूर्तता करून अर्ज सबमिट करावा. 17 ते 19 डिसेंबर : प्रवेश अर्ज छाननी व निवड यादी तयार केली जाईल. 21 डिसेंबर : www.dydekop.org संकेतस्थळावर व शहरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या सूचनाफलकावर सकाळी दहा वाजता निवड यादी प्रसिद्ध होईल. 21 ते 23 डिसेंबर : निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील.

या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत कोणतेही महाविद्यालय अलाॅट झाले नाही. त्यांना दुसऱ्या फेरीत निश्चित प्रवेश मिळेल. ज्यांना पहिल्या फेरीत महाविद्यालय अलाॅट झाले आहे. मात्र, ज्यांनी प्रवेश निश्चित केला नाही व ते भाग दोन अर्जात कोणताही बदल करणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांची नावे दुसर्‍या फेरीत आपोआप घेतली जातील. दुसरी फेरी अंतिम फेरी असेल. त्याद्वारे झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणे विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे. त्यानंतर कोणताही प्रवेश समितीच्या वतीने केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१० संघ, ७४ सामने अन् सरावाचे नियम; IPL 2026 मध्ये नेमका काय बदल झाला?

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! पाच नवीन पोलीस स्टेशन उभारण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी; पण कोणत्या परिसरात होणार?

कोलेजनचं महत्त्व काय? वाढत्या वयात सुरकुत्या टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय!

Ravichandran Ashwin: अश्विनची मोठी भविष्यवाणी! ‘हा’ खेळाडू जिंकणार ऑरेंज कॅप; म्हणाला 'जर त्याला ओपनिंगला...'

Prioritize Fuel : आंबा-काजू बागायतदारांना प्राधान्याने पेट्रोल-डिझेल द्या; महेश सप्रे यांचे तहसीलदारांना निवेदन

SCROLL FOR NEXT