secret police claiming by woman was cheated of Rs 57 000 in kolhapur 
कोल्हापूर

गोपनीय पोलिस असल्याचे सांगून महिलेला ५७ हजारांचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा

पेठवडगाव : गोपनीय पोलिस असल्याचे खोटे सांगून एकाने महिलेची ५७ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. या तोतया पोलिसावर गुन्हा दाखल झाला आहे. तानाजी पिलाजी सावंत(रा.पेठवडगाव, तुकाईनगर,भादोलेरोड) असे या तोतया पोलिसाचे नाव आहे.


याबाबत अतधिक माहिती अशी, फिर्यादी सुरेखा जाधव या निलेवाडी येथे रहाण्यास आहेत. त्या प्राथमीक आरोग्य केद्र अंबप येथे कामास आहेत. त्यांच्या जावायांचे आपघाती निधन झाले आहे. दरम्यान, तानाजी सावंत कामानिमित्त निलेवाडीला येत होता. या दरम्यान त्यांची ओळख झाली. यात त्याने मी वडगाव पोलिस ठाण्यात गोपनीय पोलिस आहे. तरी तुमच्या जावयाचे आपघाती क्लेम मी मिळवून देतो अशी बतावणी केली. या कामासाठी साठ हजार रुपये खर्च येणार असे सांगीतले. त्यानंतर त्याने याकामासाठी १७ जुलै ला सकाळी साडे दहा वाजता निलेवाडीतील घरात येवून ५७ हजार रुपये घेवून पसार झाला.

याबाबत सुरेखा कृष्णात जाधव (रा.निलेवाडी)यांनी वडगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. याबाबत पेठवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या भामट्याबद्दल अनेक तक्रारी असून नागरिकांनी त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे अवाहन प्रशिक्षीणार्थी पोलिस अधिकारी डॉ. धीरज बच्चू यांनी केले आहे.


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

एका रिलवर विश्वास ठेवला अन् १५ वर्षांनी आई झाली मराठी अभिनेत्री; व्हिडिओ शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

Petrol Pump Facilities: पेट्रोल पंपांवरील ‘हवाच गुल’, भरणार कुठे?हवेचे यंत्र बंद, शौचालयांना कुलूप; वाहनधारकांना पिण्याचे पाणीही मिळेना

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT