wrestlers thandai kusti थंडाई कुस्ती पैलवान आखाडा आहार 
कोल्हापूर

Video : पैलवानांच्या ताकदीचे काय आहे रहस्य ? जाणून घ्या...

मतीन शेख

कोल्हापूर - बलदंड शरीराचा पैलवान दिसला की अनेकांना प्रश्न पडतो, हा गडी काय बरं खात असेल ? यांचा आहार काय असले? कुस्ती खेळायला इतकी ताकद या पैलवानाकडे कशी बरी येत असले ? असे बरेच प्रश्न सामान्य माणसाला पडत असतात.

पैलवान खूप मांसाहार करतात, खूप केळी खातात, दूध पितात असं बोललं जात. परंतु मल्लांचा आहार हा संतुलित आणि विशेष स्वरुपाचा असतो. या आहारात अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे 'थंडाई'... 

कुस्ती हा मेहनतीचा कस लावणारा खेळ,  कुस्तीगिरांना आखाड्यात लढत, जोर, बैठका तसेच धावणे असे व्यायाम प्रकार करावे लागतात. यात त्यांच्या शरिराची झीज होते. ही झीज भरुन काढण्यात थंडाई हे पेय महत्वाची भूमिका बजावते.

 हल्ली बाजारात अनेक शितपेय तसेच एनर्जी ड्रिंक मिळतात. परंतु थंडाई हे पेय पारंपारिक देशी पेय मल्लाकडून घेतले जाते. 

थंडाई हे एक असे मिश्रण असते जे प्यायल्यानंतर शरीराची झीज ९५ टक्के भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. म्हणून थंडाईला पैलवानांचे अमृत असे संबोधले जाते. 

 साधारण माणसे सुध्दा आठवड्यातून २-४ वेळा थंडाई घेऊ शकतात. शरीरातील उष्णते वर तसेच अशक्तपणावर थंडाई हे प्रभावशाली असते. 

कशी बनवतात थंडाई -

साधारण १/२ लिटर थंडाईची कृती  

साहित्य - 

  • १) बदाम ३० नग 
  • २) खसखस ३ चमचे ( थंडीच्या दिवसात हिंग घालावे ) 
  • ३) बडीशेप - ५ चमचे 
  • ४ ) वेलदोडे ४ नग  
  • १/२ लिटर दूध ( थंड असेल तर उत्तम ) नसेल तर पाणीही चालेल
  • ६ ) साखर १ कप

कृती -

मिक्सर किंवा दगडी कुंडी मध्ये २५ बदाम टाकून बारीक पूड करून घेणे. कुंडी असेल तर लिंबाच्या काठीने बारीक कुटावे. त्याचप्रमाणे खसखस, बडीशेप, वेलदोडे एकत्रपणे मिक्सर मध्ये टाकून त्याचीही पूड करून घेणे. पुन्हा त्या बदामाची पूड मिक्सरच्या मोठ्या भांड्यात टाकणे आणि ३-४ कप दूध टाकून पेस्ट करून घेणे. त्यामध्ये खसखस,बडीशेप, वेलदोडे यांची पूड टाकणे. आता २-३ /२-३ कप असे दूध वाढवत जावा आणि मिक्सरने ते मिक्स करावे. शेवटी संपूर्ण दूध ज्यावेळी संपेल त्यावेळी २ मिनिटे मिक्सर चालू ठेवा. तयार मिश्रणावर फेस आल्यासारखा दिसेल. आता ते मिश्रण एका सुताच्या वाळलेल्या कापडातून घेणे. गाळलेल्या द्रव्यात त्यानंतर १ कप साखर घालून सरबत जसा खालीवर करतो त्याप्रमाणे करून घेणे. नंतर ते पिण्यास योग्य असेल.

अशाप्रमाणे घराच्या घरी थंडाई करू शकता.थंडाई बनवण्यास १० मिनिटे वेळ लागतो. जो व्यक्ती बॉडी-बिल्डींग करतो किंवा कोणताही मैदानी खेळ खेळतो त्यास हे थंडाई पेय फायद्याचे ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengal sports minister resigns : कोलकातामध्ये मेस्सीच्या कार्यक्रमात उडालेल्या गोंधळानंतर अखेर बंगालचे क्रीडामंत्र्यांनी दिला राजीनामा!

IPL 2026 Auction live : Mumbai Indians ची अन्य फ्रँचायझीकडून होतेय कोंडी! आकाश अंबानींच्या चेहऱ्यावर निराशा... Memes Viral

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Mumbai: आता ऑनलाइन अपॉइंटमेंट, आरोग्य माहिती आणि प्रमाणपत्रे एका नंबरवर मिळणार! बीएमसीकडून हेल्थ चॅटबॉट सेवा सुरू, नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT