Senior Advocate A G Muvadamath pass away
Senior Advocate A G Muvadamath pass away 
कोल्हापूर

बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. मुळवाडमठ यांचे निधन 

महेश काशीद

बेळगाव - बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील ए. जी. मुळवाडमठ यांचे आज (ता.9) सकाळी साडे दहाच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. काही दिवसांपासून ऍड. मुळवाडमठ अत्यस्थ होते. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होता. पण, त्याला प्रतिसाद दिला नाही. ते 64 वर्षाचे होते. 


मुळवाड मुळचे अथणी तालुका हालहळ्ळीचे व सध्या बेळगावात महांतेशनगर येथे ते राहत होते. काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. यामुळे त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. या दरम्यान त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि उपचाराला प्रतिसाद दिला नाही. बेळगावला सहा महिन्यांपूर्वी झालेल्या बेळगाव बार असोसिएशन निवडणुकीत श्री मुळवाडमठ यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा दारुण पराभव करत एकतर्फी विजय मिळविला होते. यामुळे ते बेळगाव बार असोसिएशनचे दुसऱ्यांदा अध्यक्ष बनले होते. 


 मुळवाडमठ यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर वकिलांसाठी महत्वकांक्षी योजना जाहीर केल्या. कोरोना कालावधीमध्ये वकिलांना मदत मिळवून दिली. शिवाय अलिकडे पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज वकिलांना मिळवून देणे आणि ज्या वकिलांकडे हक्काचे घर नाही. त्यांच्यासाठी भूखंड वा अपार्टमेंटमध्ये फ्लॅट मिळवून देण्यासाठी घरकुल योजना हाती घेण्याची तयारी केली होती. यावर कामही सुरु होते. तसेच विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा धजद, अलिकडे भाजप उमेदवारीवर निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्नशिल होते. पण, ऐनवेळी हुलकावणी देण्यात आली. एक अभ्यासू व ज्येष्ठ वकील अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या अचानक एक्‍झीटबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून असा परिवार आहे. 


संपादन - धनाजी सुर्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT