the sentiments of border residents on the eve of Maharashtra Day 
कोल्हापूर

महाराष्ट्र दिनाच्या पुर्व संध्येला सीमावाशीयांच्या 'या' आहेत भावना...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - संघर्षातुन महाराष्ट्र राज्य निर्माण झाले मात्र बेळगाव, कारवार, निपाणीसह 865 गावे महाराष्ट्रात सामील झाल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होणार नाही अशी भावना महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला सीमाभागातील युवकांमधून व्यक्त होऊ लागली आहे.

शुक्रवारी एक मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन साजरा होणार आहे. यावेळी लॉकडाऊन असल्याने सर्वत्र साधेपणाने महाराष्ट्र दिन साजरा होणार असली सीमाभागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्र राज्यात जाण्याची लागून असलेली आस अजूनही पूर्ण झालेली नाही. भाषावार प्रांतरचना करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर 1956 साली बेळगाव, कारवार, निपाणी आदी मराठी बहुल भाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला तेंव्हापासून आपल्या माय बोलीच्या राज्यात जाण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने जाण्यासाठी लढा देत आहेत. मात्र कर्नाटकी सरकार विविध मार्गांनी मराठी भाषिकांवर दडपशाही करीत आहे. कन्नडची सक्ती करीत आहेत मात्र मराठी भाषिकांनी कधीही कर्नाटकी सरकारच्या अन्यायाला भीक घातलेली नाही.  सीमाप्रश्न सुटल्याशिवाय मराठी भाषिक जनता गप्प बसणार नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून सीमावाशीयांच्या आशा उंचावल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने पावले उचलावीत असे मत मराठी भाषिकांमधून व्यक्त होत आहे.
 

संघर्षातुन निर्माण झालेल्या  महाराष्ट्र राज्यातील सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो प्रांतरचना करताना ज्या चुका झाल्या त्या सामंजस्य पणाने सुधारल्या पाहीजेत तरच मराठी भाषिकांना समाधान मिळेल
दीपक दळवी, अध्यक्ष मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती


आज महाराष्ट्र दिन ज्या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वप्रथम माझ्या बेळगाव ने रक्त सांडलं त्या बेळगावलाच महाराष्ट्रापासून वंचित ठेवलं, सिमप्रश्नी महाराष्ट्राच्या उदासीन धोरणामुळे सीमाभाग उदासीन झाला होता पण सिमप्रश्नी आग्रही सरकार आल्याने आमच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत, आशा करतो की ह्या ऐतिहासिक लढ्याला आता गती मिळेल आणि आम्ही आमच्या स्वराज्यात म्हणजेच स्वतःच्या राज्यात जाण्याच्या ह्या धडपडीला यश मिळेल
शुभम शेळके, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष


संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण व्हावे या एकाच भावनेने सीमावाशी लढा देत आहेत महाराष्ट्र दिन साजरा करीत असताना बेळगाव, कारवार, निपाणी आदि भाग महाराष्ट्र्रात लवकर सामील व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करावेत - सागर पाटील, कार्यकर्ता म ए समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Solapur Accident : तुळजापुरला जाताना काळाचा घाला, कोल्हापूर–सोलापूर रस्त्यावर भीषण अपघातात कसबा बावड्यातील दाम्पत्य ठार

फक्त 10,999 मध्ये खरेदी करा 50MP सेल्फी कॅमेरा; AI फीचर्स, iPhone सारखा जबरदस्त मोबाईल, 31 मार्चपर्यंत 14 हजारचा डिस्काउंट

Latest Marathi News Live Update : बच्चू कडू यांनी भोंदू बाबा अशोक खरातची भेट घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल

Jalgaon Crime : चॉपर हल्ल्यातील जखमी तरुणाचा अखेर मृत्यू; 500 रुपये न दिल्याने पोटात केले होते वार, दहा तास मृत्यूशी झुंज अयशस्वी

LPG Gas : गॅस तुटवड्यात काळाबाजार तेजीत; कोल्हापुरात घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर उघड

SCROLL FOR NEXT