the service of 108 ambulance in ichalkaranji stopped for late appointment of doctor in kolhapur 
कोल्हापूर

१०८ नंबरची रुग्णवाहिकाच आहे आजारी ; ड्रायव्हर असूनही सेवा मात्र ठप्प

ऋषीकेश राऊत

इचलकरंजी (कोल्हापूर) : अतिगंभीर रुग्णांना वेळेवर उपचार मिळवून देऊन प्राण वाचवणारी १०८ नंबरची रुग्णवाहिकाच आजारी असल्याचे चित्र हातकणंगले तालुक्‍यात आहे. रुग्णवाहिकेच्या गैरसोयीमुळे दोन गंभीर रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागले. तालुक्‍यातील चारही रुग्णवाहिकेवरील डॉक्‍टर प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्ग झाल्यामुळे तालुक्‍यातील १०८ रुग्णवाहिकांची सेवा काही महिन्यांपासून ठप्प आहे. 

१०८ रुग्णवाहिका सेवा महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. रुग्णवाहिकांवर ड्रायव्हर असून, केवळ डॉक्‍टर नसल्याने ही सेवा ठप्प आहे. याचा प्रत्यय दोन दिवसांपूर्वी आयजीएम रुग्णालयात आला. दोन गंभीर रुग्णांना वेळेत १०८ रुग्णवाहिका सेवा न मिळाल्याने उशिरा पुढील उपचारासाठी दाखल केले, मात्र दोन्ही गंभीर रुग्णांचा वेळेत उपचाराअभावी मृत्यू झाला. प्रत्येक रुग्णवाहिकेत डॉक्‍टर व ड्रायव्हरची नियुक्ती असते, मात्र डॉक्‍टर नसल्याने ड्रायव्हर नकार देत रुग्णवाहिकांसाठी आलेला कॉल अटेंड केला जात नाही.

हातकणंगले तालुक्‍यातील ग्रामीण व शहरी शासकीय रुग्णालयात चार १०८ रुग्णवाहिका तैनात आहेत. प्रत्येक रुग्णवाहिकेत डॉक्‍टरांची नियुक्ती असते; मात्र कोरोनाच्या काळात काही डॉक्‍टर सेवेतून बाहेर पडले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या प्रक्रियेत १०८ रुग्णवाहिकेतील डॉक्‍टर प्राथमिक आरोग्य केंद्रावर नियुक्त झाले. यामुळे रुग्णवाहिकेवरील ड्रायव्हर गंभीर रुग्णांना सेवा देण्यासाठी नकार देत आहेत. याबाबत प्रशासनाचे दुर्लक्षित धोरण व हलगर्जीपणाचा त्रास रुग्णांना व  नातेवाइकांना सहन करावा 
लागत आहे.

डॉक्‍टरांच्या नियुक्तीत विलंब

१०८ रुग्णवाहिकेवर बीव्हीजी या खासगी कंपनीचे नियंत्रण आहे. अनेक कारणांमुळे या रुग्णवाहिका जागीच उभ्या असतात. केवळ डॉक्‍टर नसल्याने रुग्णवाहिका सेवा बंद आहे. गंभीर रुग्णांची भयावह स्थिती असूनदेखील डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यास विलंब केला जात आहे.

या चार ठिकाणी १०८ रुग्णवाहिका

तालुक्‍यात हातकणंगले, हुपरी, किणी टोलनाका आणि आयजीएम रुग्णालय. (इचलकरंजी या चार ठिकाणी १०८ रुग्णवाहिका २४ तास सेवेत आहेत.)

"पीएचसीला डॉक्‍टर वर्ग झाल्याने १०८ रुग्णवाहिकेवर डॉक्‍टर सेवेत नाहीत. गंभीर रुग्णांच्या मृत्यूच्या घटना लक्षात घेता जिल्हा रुग्णालयातर्फे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. शासनाने रिक्त पदे त्वरित भरावीत."

- डॉ. सुहास कोरे, तालुका आरोग्य अधिकारी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT