servicing center will be started soon kolhapur Kalamba Jail 
कोल्हापूर

कळंबा कारागृहात लवकरच सुरू होणार सर्व्हिसिंग सेंटर

राजेश मोरे

कोल्हापूर - कारागृहातून बाहेर पडल्यानंतर बंदीना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे नवे साधन मिळावे, या उद्देशाने कळंबा कारागृहात सर्व्हिसिंग सेंटर साकारण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठविण्यात आला आहे. यातून रॅंम्प व बोरिंग साकारण्यात येणार आहे. 

रागाच्या भरात हातून घडलेल्या चुकीने गुन्हेगार चार भिंतीच्या आत अडकतो. घर नातलगांपासून दूर असलेल्या या बंदीच्यातील मानसिकता खचली जाते. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर हा समाज आपल्याला स्वीकारेल का? हाताला काम मिळेल का? घरच्यांचा जबाबदारी पेलू शकू का? असे अनेक प्रश्‍नांच्या गर्तेत सापडतो. त्याची मानसिकता खचण्याची शक्‍यता असते. त्यासाठी कारागृह प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात. त्यांच्यातील चांगल्या गुणांची जाणीव त्यांना करून दिली जाते. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील अशा गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. याचाच एक भाग म्हणून येथे सध्या शेतीसह, सुतार, लोहारकाम, बेकरी व्यवसाय, फौंन्ड्री व्यवसात कारागृहातील बंदीना काम करण्याची संधी दिली जाते. याचबरोबर आता बंदीना सर्व्हीसिंग सेंटरचेही काम करण्याची संधी लवकर उपलब्ध होणार आहे. सुरवातीला खुल्या बंदीचा विचार यासाठी केला जाणार असून किमान 15 बंदीना हे सर्व्हिसींग सेंटरमध्ये काम करून अनुभव घेण्याची संधी दिली जाणार आहे. 

कारागृहात सध्या कॉन्प्रेसरसह अन्य साहित्य उपलब्ध झाले आहे. सर्व्हिसींग सेंटरसाठी वाहने धुण्यासाठी लागणारा रॅंम्प व हे सर्व्हिसींग सेंटरसाठी चार लाखांचा खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठविण्यात आला आहे. त्याच्या मंजुरीनंतर कारागृहाच्या दर्शनी भागासमोर हे सेंटर साकारण्यात येणार आहे. नागरिकांनाही अल्पदरात ही सुविधा उपलब्ध होणार आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar Relief Hospital case: रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात कुंदन संखे यांच्यासह २२ जणांना न्यायालयीन कोठडी; पोलिसांची अतिरिक्त पोलीस कोठडीची मागणी फेटाळली

Sugar Factory Membership: कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांना सभासदत्व बंद; साखर आयुक्तांच्या परिपत्रकामुळे भीमाशंकर कारखान्याच्या प्रस्तावाला ब्रेक

MNLU Nagpur VC Appointment: डॉ. ज्योती भाकरे यांची नागपूरच्या 'महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी'च्या (MNLU) कुलगुरूपदी निवड

राहुल द्रविडच्या पोराची २११ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी,ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई! आर्यवीर सेहवागच्या पदार्पणात २८ धावा

MIDC Land Acquisition: महागावात एमआयडीसी भूसंपादन सर्वेक्षणाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; मोजणी थांबवावी लागली

SCROLL FOR NEXT