Seven health centers do not have ambulances 
कोल्हापूर

सात आरोग्य केंद्रांकडे ऍम्ब्युलन्स नसल्याने रुग्णांची कुचंबणा 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची 76 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत, मात्र यातील सात आरोग्य केंद्रांकडे वाहनेच नाहीत. पाच केंद्रांकडील वाहनांची वापराची मुदत संपली आहे, तर सरुड आणि पार्ले तर्फ ठाणे आरोग्य केंद्रांना वाहनच मिळालेले नाही. असे असले तरी शिक्षकांनी दिलेली ऍम्ब्युलन्स मात्र धूळ खात पडली आहे. ती कोणत्या आरोग्य केंद्राला द्यायची याचा निर्णय अजून झालेला नाही. 
जिल्हा परिषदेच्या 76 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला आरोग्याची सुविधा दिली जाते. गरोदर स्त्रिया, अत्यवस्थ रुग्णांसह उपचार आवश्‍यक रुग्णांना नेण्यासाठी ऍम्ब्युलन्सचा वापर केला जातो. तसेच होणारे लसीकरण, आरोग्य शिबिरे, औषधांचा पुरवठा करण्यासाठी या वाहनाचा वापर केला जातो; मात्र सध्या मलिग्रे, वडणगे, वाटंगी, केखले, तारळे या आरोग्य केंद्रांकडे ऍम्ब्युलन्स नाही. यांना दिलेली वाहने कालबाह्य झाली आहेत, मात्र कोरोनाच्या काळात वाहन नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. 
वडणगे आरोग्य केंद्राचे वाहन कालबाह्य होऊन बरीच वर्षे झाली आहेत. त्यांनी सतत ऍम्ब्युलन्सची मागणी केली आहे. मध्यंतरी सीएसआर निधीतून दोन ऍम्ब्युलन्स घेतल्या. त्यांचे वितरण चंदगड येथे केले. आमदार फंडातूनही तालुक्‍यांना ऍम्ब्युलन्स घेतल्या मात्र ज्या आरोग्य केंद्रांना ऍम्ब्युलन्सी गरज आहे, त्यांना मात्र वाहनापासून वंचित राहावे लागते. 

वडणगेप्रमाणेच इतर आरोग्य केंद्रांनीही ऍम्ब्युलन्सची मागणी केली आहे, मात्र वाहन खरेदीवर बंदी असल्याने त्याकडे दुर्लक्ष होत आहे. वास्तविक जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी यावर तोडगा काढणे आवश्‍यक होते, मात्र याकडे पाहण्यास कोणाला वेळच नसल्याचे दिसते. 
- कोमल मिसाळ, जि. प. सदस्या. 

भेट दिलेली ऍम्ब्युलन्स धूळ खात 
कोरोना काळात सामाजिक उत्तरदायित्व म्हणून राज्य प्राथमिक शिक्षक समितीने एक ऍम्ब्युलन्स जिल्हा परिषदेला भेट दिली आहे, मात्र दोन आठवड्याहून अधिक काळ हे वाहन जिल्हा परिषदेत धूळ खात पडले आहे. जर हे वाहन एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्राला दिले असते तर गोरगरीब रुग्णांसाठी वापर झाला असता. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT