Maharashtra Industrial Development Corporation esakal
कोल्हापूर

राज्यात आता MIDC ची नवीन सात कार्यालये; कोणत्या जिल्ह्यांचा असणार समावेश? लवकरच एक-एक जिल्ह्याची होणार घोषणा

Maharashtra Industrial Development Corporation : राज्यात एकूण 16 एमआयडीसीची कार्यालये आहेत. पुण्यातून बारामतीचा, कोल्‍हापुरातून साताऱ्याचा, सांगलीतून सोलापूरचा कार्यभार पाहिला जात होता.

लुमाकांत नलवडे

सध्या कोल्हापुरात आणखी दोन औद्योगिक वसाहती स्थापन करण्यासाठी गेली काही वर्षे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी भूसंपादनासह इतर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करणे आवश्‍यक आहे.

कोल्हापूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (Maharashtra Industrial Development Corporation) राज्यातील सात कार्यालयांचे विभाजन होणार आहे. त्यातून सातारा, सोलापूर, बारामती, अहमदनगर, जळगाव, अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यांत स्वतंत्र प्रादेशिक अधिकारी कार्यालय होईल. सध्या सातारा जिल्ह्यातील कामकाज कोल्हापूर, तर सोलापूर जिल्ह्यातील कामकाज सांगलीतून होते. लवकरच यातील एक एक जिल्हा स्वतंत्र होणार आहे. यासाठी आवश्‍यक ९२ पदांची भरतीही होणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसी (MIDC) जिल्ह्यातील रिकाम्या जमिनीचा वापर उद्योगासाठी करून तेथे रोजगार उपलब्ध करून देणे, औद्योगिकरणाला पाठबळ देण्याचे काम करते. काही ठिकाणी विमानतळसुद्धा एमआयडीसीकडे आहे. मात्र, एकाच जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यातील कामकाज चालत आहे. त्यामुळे एखाद्या जिल्ह्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होत होते. त्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ होत होती.

कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी उद्योजकांना सुद्धा इतर जिल्ह्यातील एमआयडीसीच्या कार्यालयात जावे लागत होते. राज्यात एकूण १६ एमआयडीसीची कार्यालये आहेत. पुण्यातून बारामतीचा, कोल्‍हापुरातून साताऱ्याचा, सांगलीतून सोलापूरचा कार्यभार पाहिला जात होता. आता मात्र नवीन नियोजनानुसार किमान सात जिल्ह्यांना स्वतंत्र कार्यालय त्यांच्या जिल्ह्यात मिळणार आहे. परिणामी जिल्ह्यातील उद्योगांना अधिक चालना देण्यासाठी नव्याने औद्योगिक वसाहती स्‍थापन करण्यासाठी जोमाने प्रयत्न होऊ शकणार आहेत.

सध्या कोल्हापुरात आणखी दोन औद्योगिक वसाहती स्थापन करण्यासाठी गेली काही वर्षे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी भूसंपादनासह इतर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करणे आवश्‍यक आहे. अशीच काहीशी स्थिती प्रत्येक जिल्ह्यात आहे. आता नव्याने होणाऱ्या सात एमआयडीसीच्या कार्यालयामुळे प्रत्येक जिल्ह्याला विशेषतः नव्याने कार्यालय होणाऱ्या ठिकाणी उद्योगांना प्रोत्साहन मिळणार आहे. प्रशासकीय पातळीवर याची तयारी सुरू झाली आहे. प्रत्यक्षात मात्र टप्‍याटप्प्याने याची घोषणा होण्याची शक्यता आहे. महामंडळाचा वर्धापन दिन एक ऑगस्टला असतो. त्यादिवशी काही घोषणा होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

पदभरतीही होणार

सात जिल्ह्यांतील प्रादेशिक कार्यालये नव्याने तयार होणार आहेत. त्यासाठी साधारण ९२ पदांची आवश्‍यकता आहे. त्याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये सात प्रादेशिक अधिकारी, पाच व्यवस्थापक, एक क्षेत्र व्यवस्थापक, सात उपरचनाकर, सात प्रमुख भूमापक, १४ सहायक क्षेत्र व्यवस्थापक, १७ सहायक, १७ लिपिक, सात वाहनचालक, दहा शिपाई पदांची भरती होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालघर साधू हत्याकांडाचे आधी आरोप केले, आता पक्षात का घेतलं? CM फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, भाजपकडून प्रवेशाला स्थगिती

Latest Marathi Breaking News: भूमकर पुलावर अपघात, पाच गाड्यांना कंटेनरची धडक

CM Devendra Fadnavis: मित्रपक्षांना शत्रू समजू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला, युती म्हणून एकत्र लढणार

Kolhapur News: कुरुंदवाडच्या रणांगणात कलाटणी! ठाकरे गट शाहू आघाडीसोबत; काँग्रेस ‘एकाकी’

Video Viral: वाहत्या पुरात हरीणाला हत्तीनं दिलं जीवनदान, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT