Seven people arrested for betting ichalkaranji 
कोल्हापूर

बेटिंग घेणाऱ्या सात जणांना अटक ; इचलकरंजीत दोन छापे

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी - आयपीएलमधील मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल यांच्यातील अंतिम सामन्यावर बेटिंग (सट्टा) घेत असतांना शहरात मंगळवारी रात्री दोन ठिकाणी छापे टाकले. दोन्ही कारवाईत सात जणांना अटक केली असून एक पसार झाला आहे. इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस उपअधीक्षक यांच्या पथकांने ही कारवाई केली. 

दाते मळा परिसरात सचिन रानडे यांच्या शेडमध्ये क्रिकेटवर बेटिंग (सट्टा) घेतला जात असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांना मिळाली. त्यानुसार छापा टाककून लाईव्ह गुरु या ऍपच्या माध्यमातून बेटिंग घेण्यात येत असल्याचे उघडकीस आले. 

कारवाईत नंदकुमार तुकाराम बारवाडे (सरस्वती मार्केट) व रनिश रतन दरक (तांबे माळ, वसंत कॉलनी) यांना ताब्यात घेतले. त्यांनी महेश शिवगोंडा पाटील (जुना चंदूर रोड) याच्यासाठी बेटिंग घेत असल्याचे कबूल केले. या प्रकरणी पाटील यालाही पोलिसांनी अटक केली. या शिवाय शितल मनोहर कुडचे (जनता चौक) याचे नाव निष्पन्न झाल्यांने त्यालाही अटक केली. बेटिंग घेत असलेले ठिकाणी स्नुकर पार्लर सुरू होते. हा या पार्लरचा मालक आहे. कारवाईत 2500 रुपये रोख, तीन मोबाईल, मोटारसायकल व मोपेड असा 2 लाख 57 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एस.एम. पाटील, एस.ए. हारगुले, एस.बी. शेख यांच्या पथकांने ही कारवाई केली. 

गोकूळ चौकात चौघांवर गुन्हा 
इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेने गोकुळ चौक येथे छापा टाकून मोबाईसह 24 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये चौघांवर गुन्हा नोंद करून तिघांना अटक केली. रहिमतुल्ला साहेबजी आंबी (गोकुळ चौक), सुरेश शिवशंकर माळी (तोडकर मळा), शकिल मेहबुब चुवेवाले (बांबू गल्ली) यांना अटक केली. मुख्य संशयित नादीर शेख (रा. मिरज) पसार झाला आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT