kolhapur sakal
कोल्हापूर

Kolhapur : बालिकेने गिळलेली पिन शस्त्रक्रियेद्वारे काढली

पन्हाळ्यातील सात वर्षीय बालिकेने गिळली पिन काढण्यात सीपीआरच्या डॉक्टर्सना यश

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पन्हाळ्यातील सात वर्षीय बालिकेने गिळलेली पिन अन्ननलिकेत अडकली होती. सीपीआर रुग्णालयातील कान, नाक, घसा विभागाच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे ही पिन काढण्यात यश मिळवले. त्यामुळे या बालिकेच्या जीवाचा धोका टळला.

चार दिवसांपूर्वी बालिकेला गिळताना त्रास होत असल्याने तिच्या आई-वडिलांनी बालिकेला सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी आणले. कान, नाक, घसा विभागाच्या डॉक्टरांनी लक्षणे समजून तातडीने घसा व मानेचे एक्स-रे काढले. या बालिकेच्या अन्ननलिकेत केसात घालण्याची पिन अडकली असल्याचे दिसले. त्यानंतर विभागप्रमुख डॉ. अजित लोकरे व डॉ. वासंती पाटील यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया करून पिन काढली.

ही पिन. १.५ सेंटिमीटर आकाराची होती. पिन दोन दिवस अन्ननलिकेत असल्याने अन्ननलिकेला छिद्र पडण्याचा धोका होता; मात्र वेळीच अचूक निदान झाल्याने तातडीने शस्त्रक्रिया करून ही पिन बाहेर काढली. पुढील उपचारानंतर बालिकेची प्रकृती सुधारली आहे. त्यामुळे बालिकेच्या प्रकृतीला असलेला धोका कमी झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित व अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे यांनी शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

Ujani Canal Tragedy: उजनी डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन फरशी कारागिरांचा बुडून मृत्यू

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

SCROLL FOR NEXT