shahu art and traditional study center start in shivaji university kolhapur said vice chairman in press conference kolhapur
shahu art and traditional study center start in shivaji university kolhapur said vice chairman in press conference kolhapur 
कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठात होणार आता लोकविद्या आणि लोकसंस्कृतीचा जागर

संदीप खांडेकर

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू लोकविद्या व लोकसंस्कृती अभ्यास केंद्र स्थापन करण्यात येत असल्याची माहिती कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी आज दिली. केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक महाविद्यालयातील प्राचार्यांकडून त्या त्या क्षेत्रातील लोककलांचे ऑडिओ-व्हिडिओ मागविले जाणार असून, ते विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यात शेतकरी, बलुतेदार, अलुतेदार, पारंपरिक व्यावसायिक, फिरस्ते व भटक्या लोकांनी सांस्कृतिक जीवन समृद्ध केले आहे. या समाजरचनेचे परंपरागत ज्ञान संचित, कला कौशल्य, व्यवसाय ज्ञान, लोककला यांचा अभ्यास, संवर्धन व हस्तांतरण करण्याच्या उद्देशाने अभ्यास केंद्र स्थापन केले जात आहे.

त्यात विविध बोली, लोकसाहित्याचे विविध प्रकार, लोकगीते, लोककथा, लोकनाट्य, म्हणी, उखाणे, वाक्प्रचार, पारंपरिक कला, विविध रूढी, परंपरा यातून आकाराला आलेल्या लोकसंस्कृतीचा अभ्यास केला जाईल. केंद्रात होणारे संशोधन, संवर्धनाचा उपयोग साहित्य, कला, संगीत, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र ज्ञानशाखांसाठी उपकारक ठरेल. त्यामुळे  केंद्र आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे केंद्र बनेल.

केंद्राची उद्दीष्टे

  • मौखिक परंपरेतील ज्ञान, साहित्य संकलन, संपादन व प्रकाशन 
  • जन समुदायांच्या ललित कलांचा अभ्यास 
  • विविध लोककला प्रकारांचे संकलन, संवर्धन व जतन
  • सर्व लोककला प्रकारांचे विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण
  • विविध समूहाचा सांस्कृतिक दृष्टिकोनातून अभ्यास
  • पारंपरिक ज्ञानाचा आधुनिक ज्ञानाशी संबंध जोडणे
  • प्रस्थापित पारंपरिक हस्तकला कौशल्यातून साकारलेल्या वस्तूंचे प्रदर्शन 
  • पारंपरिक कलाकौशल्ये नवीन पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी कार्यशाळा

उपक्रम असे :

  • मौखिक साहित्याच्या अभ्यासाचे प्रकल्प अभ्यासकांना देणे 
  • लोककला प्रशिक्षण शिबिरे घेणे
  •  पारंपरिक लोककलांचे दृकश्राव्य मुद्रण करून ते जतन करणे 
  • लोक कलाकारांची वाद्ये व इतर साहित्याचे संग्रहालय करणे 
  • पारंपरिक ज्ञान कला कौशल्यांचे प्रशिक्षण शिबिरे घेणे
  • लोकविद्या संकल्पनेतून समाविष्ट होणाऱ्या सर्व घटकांच्या अभ्यासासाठी संशोधन प्रकल्प देणे 
  • बोलीभाषांच्या अभ्यासाचे प्रकल्प पूर्ण करणे

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Ajit Pawar : दत्ता भरणेंचा शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ व्हायरल; अजितदादा म्हणतात, हस्तक्षेप केला कारण...

Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : रायगडमध्ये मतदारांनी मतदानानंतर केलं रक्तदान..

SCROLL FOR NEXT