Samarjit Ghatge vs Hasan Mushrif  esakal
कोल्हापूर

'शरद पवारांनी मुलासारखं प्रेम दिलं, सुप्रिया सुळे भाऊ मानून राखी बांधायच्या, पण त्यांनी विश्‍वासाचा सौदा केला'

Samarjit Ghatge vs Hasan Mushrif : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘त्यांना’ मुलासारखे प्रेम दिले. खासदार सुप्रिया सुळे या मोठे भाऊ मानून ‘त्यांना’ राखी बांधायच्या.

सकाळ डिजिटल टीम

शरद पवार यांच्या कागलमधील सभेनंतर अल्पसंख्याक व्यक्तीच्या मागे पवार साहेब का लागले आहेत? वडिलांसारख्या नेत्याबाबत असा जातीयवादी आरोप करणे योग्य आहे का?

कागल : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘त्यांना’ मुलासारखे प्रेम दिले. खासदार सुप्रिया सुळे या मोठे भाऊ मानून ‘त्यांना’ राखी बांधायच्या. ईडीपासून सुटका आणि आयुष्यभर न मिळालेल्या पालकमंत्री पदासाठी ‘त्यांनी’ या विश्‍वासाचा सौदा केला. त्यामुळे ‘त्यांना’ आता झोप येत नाही. यातून वैफल्यग्रस्त झाल्याने त्यांच्याकडून चुकीची वक्तव्ये येत आहेत. अशी टीका शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर नाव न घेता केली.

येथे महाविकास आघाडीच्या वतीने (Mahavikas Aghadi) पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांच्या मंजुरी पत्रांच्या वाटपाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. घाटगे म्हणाले, ‘शरद पवार हे एखाद्या प्रवेशासाठी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच कागलमध्ये आले, जयंत पाटील आले. परवा सुप्रिया सुळे पुण्याच्या मेळाव्यात आल्या. मुंबईच्या मेळाव्यात आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे येत आहेत. हे सर्वच त्यांना खुपत आहे.’

सागर कोंडेकर, सुवर्णा भोसले, रूपेश वाघमारे, अक्षय कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. रमेश माळी, शाहूचे संचालक सतीश पाटील, आनंदा पसारे, ठाकरे गटाच्या जिल्हा महिला उपाध्यक्षा विद्या गिरी, अजित मोडेकर, संभाजी ब्रिगेडचे नाना बरकाळे, सज्जन पवार, सुशांत कालेकर, पंडित पाटील, माधव करीकट्टे आदी उपस्थित होते. अरुण गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. हिदायत नायकवडी यांनी आभार मानले.

जनता हे विसरणार नाही

शरद पवार यांच्या कागलमधील सभेनंतर अल्पसंख्याक व्यक्तीच्या मागे पवार साहेब का लागले आहेत? वडिलांसारख्या नेत्याबाबत असा जातीयवादी आरोप करणे योग्य आहे का? स्व. खासदार मंडलिक यांच्यामुळे जिल्हा बँकेत तुमची एन्ट्री झाली. त्यांच्या महालक्ष्मी दूध संघाच्या कर्जाच्या वसुलीसाठीचा बोर्ड त्यांच्या घरासमोर लावला. काय वेदना झाल्या असतील? हे स्वाभिमानी जनता विसरणार नाही, असे घाटगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT