Business dependence on tourism in trouble  
कोल्हापूर

पर्यटनावर अवलंबून असणारे शाहुवाडीतील व्यावसायिक चिंतेत

अमर पाटील

बांबवडे : कोरोनाच्या संकटामुळे शाहुवाडी तालुक्‍यातील तीन महिन्यापासून पर्यटन सुनेसुने आहे. पावसाळ्यात तर शाहुवाडी तालुक्‍यात वर्षा पर्यटन अधिकच बहरते, यंदा मात्र, याबाबत शाशंकता असल्याने पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांसमोर अडचणींचा डोंगर उभा आहे. 

शाहुवाडी तालुक्‍यातील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी उन्हाळी हंगामात देशभरातू पर्यटक येऊन येथील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत असतात. यंदा मात्र, कोरोनामुळे संपूर्ण हंगामच वाया गेला आहे. अजूनही कोरोनाचा आलेख खाली येत नसल्याने लोकांमध्ये भिती आहे. शाहुवाडी तालुक्‍याचा पश्‍चिम भाग हा संपूर्ण निसर्ग रम्य व ऐतिहासिक वास्तूंमुळे प्रसिद्ध आहे. त्यामुळे आंबा, विशाळगड, पावनखिंडी, मानोली, केर्ली, बर्की, धोपेश्‍वर, जुगाई, उदगिरी ही ठिकाणे धबधबे, देवस्थान, गडकिल्ले, घाटमाथा आदी निसर्गरम्य आहेत. त्यामुळे याठिकाणी पुण्या मुंबईसह अन्य राज्यांतून हौसी पर्यटक पर्यटनासाठी येत असतात.

त्यामुळे हॉटेल्स, शेतमाल, रानमेवा, रावरान जेवणाच्या खानावळ व वाहतुक या व्यावसायिकांचे ठिकाणे नेहमी जगबजलेली असतात. मात्र, कोरोनामुळे संचारबंदी असल्याने पर्यटनासाठी घराबाहेर पडणे मुश्‍किल झाले आहे. पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांवर मोठे संकट ओढवले आहे. 

पावसाळ्यात आंबा घाटातील पाऊस, धुके, ओसंडून वाहणारे धबधबे, हिरवीगार नयनरम्य निसर्गाची अद्‌भूत दृष्ये पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते. येथे येणारा पर्यटकांचा वेगळाच वर्ग आहे. त्यामुळे या पर्यटकांची खाण्यापिण्याची व्यवस्था व्हावी यासाठी व्यवसायिकांकडून अगोदर एक-दोन महिन्यापासूनच व्यवस्था केली जाते. परंतु यंदा हा खर्च करुन जर पर्यटक आलेच नाहीतर मग करायचे काय याच चिंतेत आता व्यवसायिक आहे. 

काही कुटुंब पूर्णतः पर्यटकांवर अवलंबुन असल्याने त्यांच्या समोर यापुढे कसं जगावं हा मोठा प्रश्न आहे. शासन यापुढे कशा उपाययोजना राबवते याकडे सर्वांचे लक्ष आहे. 
येत्या काळात पर्यटना बाबत नियम शिथील केले तर काही अंशी पर्यटक बाहेर पडतील. त्यांच्यासाठी येथील काही व्यवसायिकांनी व्यवस्था केली आहे. 

10 हॉटेल्स कोविडसाठी राखीव... 
आंब्यामध्ये जवळपास लहान-मोठी 70 रेस्टॉरंट्‌स व हॉटेल्स आहेत. त्यापैकी 10 रेस्टॉरंट्‌स प्रशासनाने कोविड अलगीकरणासाठी राखीव केली आहेत. त्यामुळे अन्य हॉटेल्स व रेस्टॉरंट्‌स पर्यटकांच्या सेवेसाठी असतील. 

शाहुवाडीमध्ये प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. परंतु दुर्गम असल्याने येथील छोटे व्यवसायिक उन्हाळ्यातच सर्व साहित्य भरून ठेवतात. मात्र, यावर्षी त्यांची परिस्थिती बिकट आहे. यातूनच मार्ग काढून पर्यटकांची व्यवस्था केली जाईल याची काळजी घेत आहोत. किमान एक दिवसाचा प्रवास अंतरवारील पर्यटक येथील पर्यटनास भेट देतील त्यामुळे परिस्थिती सुधारेल अशी अशा आहे. 
- निलेश कामेरीकर व्यवसायिक, आंबा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bike Accident: आईला घेण्यासाठी आलेल्या दोघांवर काळाचा घाला; खुलताबाद रस्त्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीच्या धडक, दोन्ही मित्र ठार

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरणातून आज सकाळी ९,४३२ क्युसेक विसर्ग; गोदावरी खोऱ्यातील गावांना सतर्कतेचा इशारा

Nagpur Crime : महिलेला करायला लावली नग्न पूजा, व्हिडिओ बनवला अन्...नागपुरात भोंदूबाबाचा प्रताप उघड, 'असं' शोधायचा सावज

Neeraj Chopra: ऑलिंपिक पदकविजेता नीरज चोप्राची ब्रुसेल्स स्पर्धेतून माघार, पण अंतिम फेरीत दाखवणार आपला दम

Mahabaleshwar Rain Update; 'महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस'; भिलारमधील शाळेचा स्लॅब कोसळला, ग्रामस्थांची धावपळ

SCROLL FOR NEXT