Shailesh Balkawade will join kolhapur district as a Superintendent of Police 
कोल्हापूर

कोल्हापुरचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून शैलेश बलकवडे यांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश रात्री उशिरा काढले. येथील जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची पुणे ग्रामीण विभागाचे पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे रुजू होणार आहेत.

डॉ. देशमुख यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये येथील अधीक्षकपदाची सूत्रे घेतली. त्यांच्या कारकीर्दीत सर्वाधिक मोका कारवाया झाल्या. त्यांनी गडचिरोलीचे अधीक्षक म्हणून काम करताना नक्षलवादी भागात उल्लेखनीय कार्य केले. त्याबद्दल नुकतेच केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांना आंतरिक सेवा पदक जाहीर केले आहे.

योगायोग म्हणजे डॉ. देशमुख यांची गडचिरोलीतून कोल्हापूरला बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी बलकवडे यांची गडचिरोलीचे अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्या पत्नी कादंबरी बलकवडे गोंदियाच्या जिल्हाधिकारी आहेत. त्यांचीही येथे बदली होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, सांगलीच्या अधीक्षकपदी सिंधुदुर्गचे अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची नियुक्ती झाली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लष्करच्या कुख्यात दहशतवाद्याला अटक, ISI च्या इशाऱ्यावर भारताविरोधात रचला होता मोठा कट

Maharashtra Weather: राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा, मुंबईकर हैराण; उष्माघाताच्या घटनांतही वाढ

बाबो! मार्केटमध्ये खरंच 'प्रोटीन कंडोम' आलंय? नक्की हे आहे तरी काय? Flying Beast खरंच सीरियस की घेतोय मजा, Viral

Latest Marathi News Live Update : अमरावतीत गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची तुफान गर्दी; ब्लॅक मार्केटचा गंभीर आरोप

Crime News : येळावी फाट्यावर तरुणाकडून २ गावठी पिस्तुले जप्त; मेढा येथील संशयितास अटक, २ काडतुसे हस्तगत

SCROLL FOR NEXT