ncp sharad pawar  esakal
कोल्हापूर

Kolhapur:दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीचा निर्णय घातक

शरद पवार यांचे केंद्र सरकारला पत्र

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थ आयात करण्यासंदर्भात घेतलेला निर्णय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी घातक असून राज्यातील दूध व्यवसायाला याचा मोठा फटका बसेल. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा,

अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यासंदर्भात केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना पत्रही पाठवले असून तसे ट्विट केले आहे.

केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाचा लोणी आणि तूप यासारखे दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याचा हेतू आहे. यासंदर्भात केंद्राचा कोणताही निर्णय पूर्णपणे अस्वीकार्य असेल,

असे पवारांनी या पत्रात म्हटले आहे. या उत्पादनांच्या आयातीचा देशातील दूध उत्पादकांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होईल. दूध उत्पादक शेतकरी अलिकडेच कोविड संकटातून बाहेर आले आहेत. त्यात असा निर्णय घेतल्यास दुग्धव्यवसाय क्षेत्राच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेवर गंभीर अडथळा निर्माण होईल,

अशी भीती पवार यांनी पत्रात नमूद केली आहे. या प्रकरणाकडे लक्ष दिल्यास आणि मंत्रालयाने दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याच्या कोणताही निर्णय घेण्यापासून परावृत्त केल्यास मला आनंद होईल, असेही पवारांनी पत्रात म्हटले आहे.

तफावतीवर सरकारचे लक्ष

नवी दिल्ली : राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाबरोबरच केंद्र सरकारही डेअरी उत्पादनांच्या मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावतीवर लक्ष ठेवून आहे, असे सरकारतर्फे आज सांगण्यात आले. तसेच, परिस्थितीनुसार आयातीबाबतचा निर्णय घेण्यात येईल,

असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ‘डेअरी क्षेत्रात मागणी आणि पुरवठ्यात काही तफावत आहे. कोरोना काळानंतर अधिक पोषक आणि सुरक्षित दुधाची आणि संबंधित उत्पादनांची मागणी वाढल्याने ही तफावत आहे,’ असे मत्स्य, पशु संवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाने सांगितले.

माध्यमांमध्ये आलेल्या माहितीच्या आधारे शरद पवार यांनी ट्विट करण्याऐवजी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्र्यांकडून किंवा सचिवांकडून माहिती घ्यायला हवी होती. लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर काही राज्यात दुधाचे संकलन घटले आहे. मात्र, महाराष्ट्रात फारसा फरक पडलेला नाही. महाराष्ट्रातील घराघरांत तूप बनविले जाते. अन्य राज्यांच्या तुलनेत लोणी जास्त खाल्ले जात नाही. त्यामुळे महाराष्ट्रावर या निर्णयाचा फारसा परिणाम होणार नाही.

- राधाकृष्ण विखे- पाटील, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT