Sharad Pawar help to people trapped in Iran
 Sharad Pawar help to people trapped in Iran 
कोल्हापूर

इराण मध्ये अडकलेल्यांसाठी शरद पवार आले धावून...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्रामुळे इराणमध्ये अडकलेल्या भाविकांच्या मायदेशी परतण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून भाविकांची आत तेहरान येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीचा ज्यांचा अहवाल नकारात्मक येईल, त्यांचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा होईल. ज्यांचा वैद्यकीय अहवाल सकारात्मक येईल त्यांना मात्र इराणमध्येच थांबावे लागेल.धार्मिक यात्रेसाठी टॅव्हल्सच्या माध्यमातून ४४ प्रवासी परदेशात गेले होते. यात कोल्हापूरचे सतरा, अकलूजचे नऊ, बेळगावचे दोन, इस्लामपूरचे चार, कुडचीचे चार तसेच अन्य भाविकांचा समावेश आहे.

इराणमधील भाविकांच्या परतीच्‍या आशा पल्लवित

गेल्या काही दिवसांपासून ४४ भाविक तेहरान येथे अडकून पडले आहेत. आज कूम शहरातून त्यांना तेहरानमध्ये आणण्यात आला. कोरोना व्हायरसची लागण झाली आहे की नाही, याची तपासणी झाली. वैद्यकीय अहवाल मुंबई तसेच पुणे येथील प्रयोगशाळेत येतील. तेथून लागण झाली आहे की किंवा नाही, याची खातरजमा होईल. ज्यांचे अहवाल नकारात्मक येतील. त्यांना विमानाने भारतात आणले जाईल. मात्र, ज्यांचे अहवाल सकारात्मक येतील त्यांना इराणमध्येच थांबावे लागेल.

साज ट्रॅव्हल्सचे मुन्ना सय्यद यांच्या माध्यमातून भाविक यात्रेसाठी गेले होते. सय्यद यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना फोनद्वारे भाविकांची कैफियत सांगितली. त्यानुसार पवार यांनी परराष्ट्र मंत्र्यांशी पत्रव्यवहार करून त्यांचे लक्ष वेधले. तातडीने सुत्रे हालली आणि आज भाविकांची वैद्यकीय तपासणी झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: धोकादायक डेव्हिड मिलर आऊट; सुरुवातीच्या धक्क्यांनंतर गुजरातचा सावरला डाव

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT