कोल्हापूर

Sharad Pawar: नेहरु ते मोदी अशा पंतप्रधानांमुळं इस्त्रोला यश - शरद पवार

कोल्हापूरमध्ये शरद पवार यांची सभा पार पडली, यावेळी त्यांनी चांद्रयानाच्या यशात सर्वांचा वाटा असल्याचं सांगितलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

कोल्हापूर : भारताचं चांद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर पोहोचणं ही देशासाठी मोठी घटना आहे. या ऐतिहासिक घटनेत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंपासून आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांचं योगदान होतं, त्यामुळं इस्त्रोला हे यश मिळालं, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलं आहे. (Sharad Pawar rally in Kolhapur Success of ISRO due to PMs from Nehru to Modi)

पवार म्हणाले, "या सभेनिमित्त मला एका गोष्टीचं आनंद झाला, संपूर्ण जग काल संध्याकाळी चांद्रयान ३ चंद्रावर उतरणार होतं, म्हणून तिकडं डोळे लावून बसले होते. ते उतरलं, एक ऐतिहासिक काम या देशातील वैज्ञानिकांनी करुन दाखवलं. या कामात महत्वाची भूमिका इस्त्रोनं केली. या इस्त्रोच्या स्थापनेची भूमिका जवाहरलाल नेहरुंची होती. त्यानंतर याच इस्त्रोसाठी इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, अब्दुल कलाम यांच्यासह आजचे पंतप्रधान मोदी यांचंही योगदान महत्वाचं होतं"

कोल्हापूर देशाला दिशा दाखवणारी नगरी

मिळालेली सत्ता सामान्यांसाठी वापरायची असते हे कोल्हापूरनं आपल्याला सांगितलं. शिवाजी महाराजांनी असं राज्य उभं केलं जे भोसल्यांचं राज्य नव्हतं तर रयतेचं राज्य होतं. दुसरे एक राजे या देशात होऊन गेले ज्यांनी आपली सत्ता घेऊन सामाजाच्या बाजूनं राहिले. त्यांनी चुकीच्या गोष्टींना पाठींबा दिला नाही.

ढोंगी लोकांना त्यांनी कधी संमती दिली नाही, भोंदूगिरीचा पुरस्कार शाहूंनी कधी केला नाही, ते म्हणजे शाहू महाराज, अशा शब्दांत त्यांनी शाहू महाराजांचा दाखला देताना भाजपवर निशाणा साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT