Sharad-Pawar-PM-Modi 
कोल्हापूर

Sharad Pawar: "त्यामुळं मोदींनी कारवाई केली असेल तर माझी तक्रार नाही"; शरद पवार असं का म्हणाले?

कोल्हापूरमध्ये शरद पवार यांची आज जाहीर सभा पार पडली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातून सत्ता काढून ती आता तरुणांच्या हाती द्यायला पाहिजे, अशा आशयाचं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलं आहे. कोल्हापुरात आज त्यांची जाहीर सभा पार पडली यावेळी ते बोलत होते. त्याचबरोबर मोदींच्या कारवाईविरोधात आपली तक्रार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. (Sharad Pawar says I have no complaint if Modi has taken action in Kolhapur rally)

पवार म्हणाले, "आता माझ्या लक्षात आलं की देशाचे प्रधानमंत्री भोपाळला गेले आणि तिथं त्यांनी आपल्या भाषणात काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारी पक्ष आहे आणि दोन नंबरचा भ्रष्टाचारी पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस आहे, असं म्हटलं. पण खरंच जर याची माहिती मोदींना असेल आणि त्यामुळं जर त्यांनी कोल्हापुरात काही कारवाई केली असेल तर मी त्यासंबंधी काही तक्रार करणार नाही"

तर त्यांना धडा शिकवा

असा भ्रष्टाचार तुम्ही केलेला असेल मग तो कुठल्याही पक्षाचा असेल, कुठल्याही राज्याचा असेल किंवा कुठल्याही जिल्ह्याचा असेल त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवणं, ईडीचं काम आहे. पण ते काम न्यायानं केलं पाहिजे.

सत्तेचा गैरवापर करुन, राजकारण करुन सत्तेचा हवा तसा वापर करुन लोक तयार होत नाहीत तर तपास यंत्रणांचा वापर करणार असतील तर अशा लोकांना आपण त्यांना धडा शिकवला पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.

मोदींकडून सत्ता काढून नव्या पिढीला द्या

२०२४ हे निवडणुकीचं वर्ष आहे, मत देण्याचा अधिकार तुम्हाला आहे. आपण बारकाईनं लक्ष ठेवू, सत्तेचा गैरवाप कुणी केला? शेतकऱ्यांचं नुकसान कोणी केलं, कांद्याचं नुकसान कोणी केलं? ऊस उत्पादकांना अन्यायकारक वागणूक कोणी दिली? तरुणांना बेरोजगारीत कुणी ढकललं? या सर्व गोष्टींचा आढावा आपण घेऊ.

हे सर्व आपल्याला बदलायचं असेल तर भाजप आणि त्यांच्याबरोबर जे कोणी नरेंद्र मोदींच्यासोबत आहेत त्यांचं सरकार काढून नव्या पिढीच्या हाती सत्ता देणं आणि या नव्या पिढीमार्फत सरकार चालवण्याची कामगिरी आपल्या सर्वांना करायला लागेल, यासाठी तुम्ही तयार राहा, असं आवाहन त्यांनी शेवटी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

पुलाचा एक मार्ग सुरू करण्याची घाई ११ जणांच्या जीवावर, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे बळी; मुरबाडवर शोककळा

Jalgaon Temperature : जळगावसह जिल्ह्याचा पारा पोहोचला ४१ अंशांवर; रस्‍त्‍यांवर दुपारी शुकशुकाट

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

SCROLL FOR NEXT