She set up a liquor store at home 
कोल्हापूर

भरवस्तीत तिने घरातच मांडले दारूचे दुकान

राजेश मोरे

कोल्हापूर ः साळोखेनगरातील महादेवनगरी परिसरात वाहनातून आणलेल्या मद्याचा घरात साठा करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या महिलेसह दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडून 64 हजारच्या मद्यासह टेंपो व मोटार असा सात लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे अशी शिवानी युवराज कुरणे, ओंकार राजेंद्र साळोखे (शिवाजी पेठ) अशी आहेत. 
पोलिसांनी दिलेली माहिती, साळोखेनगर महादेवनगरी येथील भाड्याच्या घरात विक्रीसाठी मद्याचा साठा केला जात असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकाला पाचारण केले. पोलिसांनी दुपारी येथे सापळा रचला. येथे महिला व तरुण बेकायदेशीररीत्या गोवा बनावटीचे मद्य टेंपो व मोटारीतून घरात साठा करण्याचा प्रयत्न करीत होते. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांनी आपली नावे शिवानी कुरणे व तिचा भाऊ ओंकार साळोखे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून 64 हजार 130 रुपये किमतीचा मद्यसाठा आणि टेंपो व मोटार असा एकूण 7 लाख 14 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई उपनिरीक्षक योगेश पाटील, अंजना फाळके, कर्मचारी विजय कोळी, अनिल ढवळे, प्रकाश संकपाळ, रमेश डोईफोडे, परशुराम गुजरे, सचिन देसाई, योगेश गोसावी, प्रदीप पाटील, संदीप बेंद्रे, शाहू तळेकर, साक्षात्कार पाटील, उत्तम गुरव यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT