she working in cashew factory and achieved success in hsc exam 
कोल्हापूर

काजूच्या फॅक्टरीत काम करत तिने बारावीला मिळवले ८६% मार्क ; निकाल पाहायला मोबाईल ही नव्हता जवळ...

अशोक तोरस्कर

उतूर (कोल्हापूर) - गुरुवारी बारावीचा निकाल... सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले होते ते निकाल दाखवणाऱ्या वेबसाईट वरती. प्रत्येक जण आपला निकाल पाहण्यासाठी उत्सुक, आतुर आणि थोडा बेचैन होता. प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. निकालाची वेळ जवळ आली तस तसे त्यांचे मन अजूनच धास्तावत होते. १ वाजता सगळ्यांची एकच गडबड उडाली प्रत्येक विद्यार्थी आपल्या अँड्रॉईड मोबाईल वर निकाल पाहू लागला. आनंदोत्सव साजरा करू लागला. मात्र जिच्याकडे मोबाईलच नाही तिच्या मनाची मात्र घालमेल सुरु होती.

किती मार्क पडले असतील ? काय झालं असेल ? मनात ठरवलेली तितकी मार्क पडली असतील का ? पण कसा बघायचा निकाल. मोबाईल तर आपल्याकडे नाही. मैत्रिणीला सीट नंबर दिलाय तिचा पण पत्ता नाही. असे असंख्य प्रश्न तिच्या मनात घोळत होते. एवढ्यात ती मैत्रीण दिसली आणि लांबूनच तिने तुला ८६% मार्क पडले असं सांगितलं अन् तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. कारण या यशाल तिच्या कष्टाची किनार होती.काजूच्या फॅक्टरीत काम करीत अभ्यास करुन मिळवलेले हे यश होतं. या यशस्वी मुलीचे नाव आहे सानिका आनंदा लाड.

उतूर (ता.आजरा) येथील इंदिरानगर येथे राहणा-या सानिकाची घरची परिस्थीती बेताची. आई दुस-याच्या शेतात मजूरीसाठी जाते.वडील गवंड्याच्या हाताखाली काम करतात.मात्र सानिकाने आपल्या परिस्थितीचा कधी बाऊ केला नाही. सकाळी कॉलेज झाले की जवळच असणा-या काजू फॅक्टरीत जायचे. काजू आणायचे आणि ते बियाचे टरफल काढून परत द्यायचे, यातुन मिळालेल्या पैशाचा तिच्या शिक्षणाला व कुटूंबाला हातभार लागायचा असा तिचा दिनक्रम. टरफल सोलता सोलताच अभ्यास सुरु असायचा. वर्षभर झालेला अभ्यास आणि परिक्षेत सोडवलेले पेपर यामुळे आपल्याला ८५ % टक्के मार्क मिळतील अशी तिची अपेक्षा होती. निकाल लागला आणि तिला ८६.६१ % गुण मिळाले.

सानिकाला दहावीला ८४ % गुण होते. तिच्या बरोबरच्या मैत्रिणी सायन्स शाखेला गेल्या. सायन्स शाखेसाठी १२ कि.मी. असलेल्या गडहिंग्लजला जावे लागणार होते. मात्र आर्थिक परिस्थिती आणि याबरोबर घराला हातभार म्हणून सुरु केलेले काजूचे काम याचा मेळ बसत नसल्यामुळे तिने उत्तूर ज्युनिअर कॉलेजला वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला.वाणिज्य शाखेत शिकत असताना तिला साहित्य या विषयात अधिक रुची जाणवू लागली ती अधून मधून कविता पण करू लागली.आता पुढच्या वाटचालीमध्ये तिला एमपीएससी/यूपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे.

तिला आता मार्गदर्शनाबरोबर आर्थिक मदतीची गरज आहे.
दानशुर व्यक्ती अथवा संस्थानी मदत केली तर एक महिला अधिकारी निर्माण होणार आहे.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT