Shendri Lake Will Be Repair Soon Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

शेंद्री तलावाच्या गळतीचे ग्रहण सुटणार

अवधूत पाटील

गडहिंग्लज : शेंद्री (ता. गडहिंग्लज) येथे चार-सव्वाचार दशकापूर्वी पाझर तलाव काढण्यात आला. मात्र, वर्षागणिक त्याची दुरवस्था होत गेली. तलावाला गळतीचे ग्रहण लागले. शिवाय वाढलेल्या झाडांमुळे गळती वाढण्याचा धोका होता. अखेर ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्यातून यंदा तलावाच्या दुरुस्तीसाठी एक कोटी 13 लाखांचा निधी मंजूर झाला. आतापर्यंत दुरुस्तीचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. गळतीमुक्तीनंतर शेंद्रीकरांना ऐन उन्हाळ्यात या तलावातील पाणी शेतीसाठी उपलब्ध होणार आहे. 

शेंद्री गावच्या उत्तरेला ओढ्यावर 1977-78 साली पाझर तलाव बांधला. दुष्काळात झालेल्या अनेक तलावापैकी हा एक तलाव. सध्या जिल्हा परिषदेकडे या तलावाची मालकी आहे. तलावाची क्षमता 16.41 दशलक्ष घनफूट इतकी आहे. गावचे जवळपास 70 टक्के क्षेत्र या तलावावर अवलंबून आहे. मात्र, त्याला गेल्या काही वर्षांपासून पायातून व मातीकामातून गळती सुरू झाली. दिवसेंदिवस गळती वाढतच होती. मार्च-एप्रिल महिन्यापर्यंतच सारे पाणी निघून जात होते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात गरजेच्या वेळी पाणी उपलब्ध होत नव्हते. शिवाय तलावावर मोठमोठी झाडे होती. परिणामी, गळती वाढण्याचा धोका अधिक होता. 

तलावाच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीने पाठपुरावा सुरू केला. तत्कालीन आमदार संध्यादेवी कुपेकर यांनीही दुरुस्तीबाबत जिल्हा परिषदेला पत्र दिले होते. त्यानंतर तलावाच्या दुरुस्तीसाठी एक कोटी 13 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. 28 एप्रिलपासून दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली आहे. तलावावरील सर्व झाडे-झुडपे काढण्यात आली आहेत. जुने पिचिंग काढण्यात आले. रिसेक्‍शनिंग करून घेण्यात आले आहे. सात ते दहा मीटर पाशान लागेपर्यंत चर मारून सीओटी फौंडेशन करून घेतले आहे. 500 मायक्रॉनचे प्लास्टिक घातले आहे. माती, मुरूम व दगडी पिचिंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या चार-पाच दिवसांत उर्वरित काम पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. 

पाणी वाढण्यास मदत... 
शेंद्री पाझर तलावाची दुरुस्ती केल्यामुळे मार्च-एप्रिलला संपणारे पाणी मे महिन्यापर्यंत राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाय तलावाच्या दुरुस्तीसाठी माती, मुरूम तलावातीलच वापरला आहे. साधारण 20 हजार क्‍युबिक मीटर इतका वापर झाला आहे. साहजिकच तलावात पाणी साठा वाढण्यास मदत होणार आहे. 

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमारांना हटवणं सोपं नाही, नोटीस ते राष्ट्रपतींच्या आदेशापर्यंत अनेक टप्पे; कशी असते प्रक्रिया?

Bike Accident : बिडकीन–शेकटा मार्गावर भीषण अपघात! दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; नातेवाइकांकडून घातपाताचा संशय, पोलिसांचा तपास सुरू

Satana Ganpati Visarjan : सटाण्यात अभूतपूर्ण जल्लोषात गणरायाला निरोप! शहराच्या इतिहासात प्रथमच उशिरा विसर्जन मिरवणूक

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

SCROLL FOR NEXT