shepherds allowed to migrate in lockdown kolhapur 
कोल्हापूर

अखेर मेंढपाळांना स्थलांतरास मिळाली परवानगी पण....

सकाळवृत्तसेवा

उजळाईवाडी (कोल्हापूर) - कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आलेल्या आहेत. परंतु अति पावसाच्या काळात पशुधन वाचवण्यासाठी मेंढपाळांना कराव्या लागणाऱ्या स्थलांतराचा प्रश्न गंभीर बनला असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी पालन महामंडळाच्या वतीने मेंढपाळांना स्थलांतरास परवानगी दिल्याने स्थलांतराचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी अनेक प्रतिष्ठित व्यक्ती संस्था, संघटना यासह मेंढपाळांनी लोकप्रतिनिधी व शासनाकडे आग्रहाची मागणी केली होती.
परंतु यासाठी पोलीस यंत्रणा व महसूल विभाग यांच्याकडून स्थलांतरास संदर्भातील परवाना आवश्यक असून यामुळे २४ तास ऑन ड्यूटी असणाऱ्या मेंढपाळास अशा परवान्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रक्रियेची माहिती नसल्यामुळे नवीन प्रश्न निर्माण होणार आहे.

महसूल विभाग आता पोलीस यंत्रणांकडे करावा लागणारा ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज कसा करावा याची माहिती बऱ्याच मेंढपाळांना असत नाही व सतत मेंढ्यांच्या मागे फिरावे लागत असल्यामुळे यासाठी पाठपुरावाही करणे यांना जमत नाही. त्यामुळे विशेष बाब म्हणून मेंढपाळांना या परवान्याच्या अटीतून सवलत मिळावी अथवा यासाठी सहज सुलभ पर्यायी व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केली आहे.

स्थलांतर अत्यावश्यकच

अति पर्जन्याच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्यत: भटकणारा मेंढपाळ रानातून पावसाळ्यात फिरू शकत नाही. औद्योगिकीकरण, नागरिकरण व पायाभूत सुविधांच्या विकासामुळे चराऊ कुरण उपलब्ध नसल्याने चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण होतो तसेच अति पर्जन्याच्या काळात  साथीच्या आजारांची वाढ होऊन शेळ्यामेंढ्या दगावण्याचे प्रमाण वाढते. याउलट कमी पर्जन्याच्या क्षेत्रात शेळ्या-मेंढ्यांच्या स्थलांतरामुळे शेळ्या मेंढ्यांचे आरोग्य उत्तम राहते व प्रजनन वाढल्यामुळे उत्पादनही चांगले मिळते असा अनुभव अनेक जुने जाणते मेंढपाळ सांगतात.

कोल्हापूर जिल्ह्यात

  • एक लाख कुटुंबे मेंढपाळ
  • पाच लाख व्यक्ती मेंढपाळ व्यवसायावर अवलंबून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT