shirol taluka farmers depressed cabbage destroy in farming agriculture marathi news 
कोल्हापूर

मन , मनगटंही पडले दुबळे ; विळ्याचा सपा सप घाव घालत कोबी शेतातच नष्ट

गणेश शिंदे

जयसिंगपूर (कोल्हापूर) : राज्यासह दिल्ली, अहमदाबाद, बंगळूर या प्रमुख बाजारपेठांमध्ये दबदबा निर्माण केलेला शिरोळ तालुक्‍यातील कोबी उत्पादक शेतकरी मातीमोल दरामुळे पुरता हैराण झाला आहे. किलोला केवळ दीड रुपया भाव मिळत असल्याने तो जवळच्या बाजारातही विकणे परवडत नाही. त्यामुळे कोबीवर विळा चालवून तो शेतातच नष्ट करावा लागत आहे.  एकरी सुमारे पन्नास हजार रुपये खर्चून शेतकऱ्यांनी कोबीची लागवड केली. खते, रासायनिक औषधांसह मजूरीचा खर्च वाढला. मात्र, शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकविलेला कोबी दराअभावी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरत आहे. 


कधी महापूर तर कधी लॉकडाऊन तर कधी दरामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी तोट्याची शेती करु लागला आहे. सातत्याने नुकसानीत राहूनही मातीशी नातं जपणारा हा शेतकरी मात्र, सततच्या अडचणींमुळे आता हतबल झाला आहे.  नांदणी (ता. शिरोळ) येथील कोबी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या बाजारपेठांमध्ये नांदणीच्या कोबीचे मार्केटींग करण्यात इथला शेतकरी मागे नाही. मात्र, महापूराबरोबर आलेल्या विविध समस्यांमुळे मन आणि मनगटंही आता दुबळी पडू लागली आहेत. 

लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर पुण्या, मुंबईसह राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये नांदणीच्या कोबीची निर्यात सुरु झाली. अडीच-तीन महिने काबाडकष्ट करुन पिकविलेला कोबी मात्र, अपेक्षेप्रमाणे शेतकऱ्याला साथ देत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे. नांदणीसारख्या भाजीपाला उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या गावात काढणीला आलेल्या कोबीवर विळा चालवून त्याचे शेतातच खत करण्याची दुर्दैवी वेळ बाजारातील भावाने आणली आहे. लॉकडाऊनच्या काळातही गावातील भाजीपाला फुकटात वाटून उरलेला भाजीपाला शेतातच गाडण्याची वेळ आली होती. यानंतरच पुन्हा उभारी घेण्यासाठी शेतात रक्त आटविणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली असून मायबाप सरकारने आता राजकीय डावपेचातून थोडा या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष द्यावे इतकीच माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

कर्ज वसुलीचा तगादा आणि दराचा झोल 
मार्च एडींगमुळे बॅंका, पतसंस्थांनी वसुलीची मोहिम गतीमान केली आहे. शेतात भाजीपाल्याला चांगला दर येईल आणि कर्जाचा भार हालका होईल अशी अपेक्षा बाळगलेल्या शेतकऱ्याच्या पदरी केवळ निराशा  आहे.  वसुलीच्या तगाद्यावर उतारा शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

शेतकरी कोलमडला 
एकरी सुमारे ५० हजार रुपये खर्चून, अडीच-तीन महिने जीवापाड जपून पिकविलेल्या कोबीला प्रतिकिलो दिड रुपया भाव मिळत असल्याने शेतकरी कोलमडला आहे. पुणे, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, बेंगलोर यासह मोठ्या बाजारात जाणारा कोबी आता गावच्या बाजारातही काढून विकण्यास परवड नसल्याने आता याच पिकावर विळा चालविण्याची वेळ आली आहे. 
 
अर्धा एकर शेतीत २२ ते २५ हजार रुपये खर्च करून कोबी पिकविला. लहान मुलाप्रमाणे पिकाची काळजी घेऊन त्याला वाढविले; पण प्रतिकिलोला केवळ दीड-दोन रुपये भाव मिळत असल्याने घातलेला खर्च निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे कोबी शेतातच नष्ट करावा लागत आहे. 
- बाबासो कुगे, शेतकरी

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पती-पत्नीच्या गुप्त कॉल रेकॉर्डिंगलाही पुरावा मानलं जाणार; हायकोर्टाचा निकाल रद्द करत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

IND vs ENG 3rd Test: शांत होता, उगाच डिवचले! जोफ्रा आर्चरने भन्नाट चेंडूवर रिषभ पंतचा उडवला दांडा, Video

त्या कुणाला जास्त जवळ येऊ द्यायच्या नाहीत... 'खुदा गवाह'च्या 'पाशा'ने सांगितलं सेटवर कशा वागायच्या श्रीदेवी

Crime News : कंपनी कामगार निघाला सोनसाखळी चोर: झटपट पैशांसाठी करायचा चैनस्नॅचिंग

Uttarakhand : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनंतर CM धामी यांची नवी योजना; जाणून घ्या काय आहे ‘लिगेसी प्लॅन’

SCROLL FOR NEXT