Shirol taluka may become corona hotspot
Shirol taluka may become corona hotspot 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील हा तालुका बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट ?

डी. आर. पाटील

शिरोळ - तालुक्‍यामध्ये दहा दिवसांत तब्बल पन्नास कोरोनाबाधित रुग्ण यामध्ये दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांचा वाढीचा आलेख पाहता शिरोळ तालुका हॉटस्पॉट बनण्याची शक्‍यता आहे. तालुका कंटेन्मेंट झोनमध्ये जाऊ नये यासाठी नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घातलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्‍यकता आहे.

शिरोळ तालुक्‍यालगत इचलकरंजी शहर तसेच कर्नाटकातील सीमा भाग व सांगली, मिरज शहरांचा समावेश आहे. शिरोळ तालुक्‍याभोवती असलेल्या शहरांच्या व कर्नाटक सीमा भागामुळे दहा दिवसांत तब्बल पन्नास नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये नांदणी व जयसिंगपूर येथील दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. 11 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कुरुंदवाड, मजरेवाडी परीसरात तब्बल 25 रुग्ण आढळले आहेत. जयसिंगपूर तसेच शिरोळमध्येही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिक भयभीत होत असले तरी अनेक जण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. शिरोळ तालुक्‍यामध्ये कोरोनाचा वाढता आलेख पाहता याला ब्रेक लावण्यासाठी गावातील दक्षता समितीने दक्ष राहून नागरीकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.

शिरोळ तालुक्‍यामध्ये दहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे ही बाब आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे. प्रत्येकाने सुरक्षित अंतर ठेऊन गरजेनुसार घराबाहेर पडावे, बीपी, शुगर यासारखे आजार असणाऱ्या नागरिकांनी तसेच वृद्धांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडू नये. सामाजिक बांधिलकी म्हणून युवकांनी कोरोनाची गंभीरता लक्षात घेऊन प्रबोधनात सामिल न झाल्यास कोरोनाच्या साखळीला ब्रेक लागणार नाही.
- सौ. अपर्णा मोरे-धुमाळ, तहसीलदार, शिरोळ

संपादन - अमरसिंह घोरपडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT