Shiv Sena Protest Against prostitution esakal
कोल्हापूर

Kolhapur : वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांविरोधात मुख्यमंत्र्यांची शिवसेना आक्रमक; व्हिनस कॉर्नर परिसरात मध्यरात्री आंदोलन

कोल्हापूर शहरात वेश्या व्यवसायाविरोधात मुख्यमंत्र्यांची शिवसेना (Shiv Sena) आक्रमक झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात मध्यरात्री आंदोलन करण्यात आलं.

कोल्हापूर : शहरात वेश्या व्यवसायाविरोधात मुख्यमंत्र्यांची शिवसेना (Shiv Sena) आक्रमक झाली आहे. शिवसेनेने मध्यरात्री जोरदार आंदोलन करत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची पळता भुई थोडी केली.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात मध्यरात्री आंदोलन करण्यात आलं. शहरातील वेश्या व्यवसायांमुळे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावल्याचं शिवसैनिकांचं मत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या वतीने व्हिनस कॉर्नर परिसरात जोरदार घोषणाबाजी करत मध्यरात्री अचानक उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळं शाहूपुरी पोलिसांची प्रचंड दमछाक झाली. दरम्यान, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांच्या जीपमध्ये जाऊन बसावं लागलं. 'हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है', असा शिवसैनिकांनी इशारा दिला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात हे आंदोलन सुरु होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde:'विधान परिषदेत शशिकांत शिंदेंचा पेन ड्राइव्ह बॉम्ब'; कोरेगावच्या पोलिस अधिकाऱ्याची संभाषण क्लिपने उडाली खळबळ..

Mumbai: हजारो कुटुंबांना दिलासा देणारा निर्णय! अवाजवी मेंटेनन्स आणि वाढीव वीजबिलावर लगाम लागणार; सरकारची मोठी घोषणा

Sydney Shooting : ऑस्ट्रेलियातील सिडनीत दहशतवादी हल्ला? दोन अज्ञातांकडून अंदाधुंद गोळीबार; १० जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update: ओबीसी आंदोलक अँड.मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला, अज्ञातांकडून दगडफेक

Crime: आधी अमानुष मारहाण; नंतर जीवे मारण्याची धमकी, शिक्षकाचं ७ वीच्या विद्यार्थिनीसोबत धक्कादायक कृत्य, कारण काय?

SCROLL FOR NEXT