shiv sena protest kolhapur gargoti 
कोल्हापूर

गारगोटीत इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेतर्फे आंदोलन 

धनाजी आरडे

गारगोटी : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसची प्रचंड दरवाढ केली आहे. यामुळे केंद्र सरकार व दरवाढीच्या विरोधात येथे शिवसेनेच्यातीने जोरदार निदर्शने केली. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढून दरवाढीविरोधात घोषणाबाजी केली. तहसीलदार अश्विनी अडसूळ यांना  याबाबतचे निवेदन दिले. 

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, केंद्र सरकारच्यावतीने दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या किमतीत दरवाढ होत आहे. आधीच सर्वसामान्य माणूस कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक विवंचनेत सापडला आहे. सततच्या होणाऱ्या पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जीवन मेटाकुटीस आले आहे. महागाईच्या वणव्यातून सामान्य माणसाला बाहेर काढण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. 

उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. नंदकुमार ढेंगे, कल्याण निकम, अंकुश चव्हाण, यशवंत नांदेकर, मदन देसाई, तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, अशोक दाभोळे, महादेव पाटील, वसंत कांबळे, सुशांत सुर्यवंशी, रणधीर शिंदे, कृष्णात देसाई, श्रीकांत हावळ, अल्ताफ बागवान, राजेंद्र चिले, दीपक देसाई, संग्राम सावंत, विद्याधर परीट, पांडुरंग कांबळे, दशरथ राऊत, अजित चौगले आदी उपस्थित होते. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT