Shiva Jayanti as per government rules and regulations in kolhapur 
कोल्हापूर

शासनाच्या नियम, अटीनुसार शिवजयंती 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासन जे नियम व अटी घालून देईल त्यानुसार शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय शिवाजी तरुण मंडळाच्या बैठकीत आज झाला. शिवाजी पेठेच्या वतीने दरवर्षी 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने शिवजयंती कोणत्या पद्धतीने साजरी करायची याबाबत चर्चा झाली. 

शिवाजी पेठेच्या मिरवणुकीला ऐतहासिक परंपरा आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी केली जाते. उभा मारुती चौकात साजऱ्या होणाऱ्या उत्सवास लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. देणगीदारांच्या मदतीतून उत्सव साजरा होतो. कोरानाचे संकट अद्यापही कमी झालेले नाही. गर्दी टाळा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. उभा मारुती चौकापुरता उत्सव साजरा करायचा की मिरवणूक काढायची याबाबतचा निर्णय पुढील बैठकीत घेण्याचे ठरले. मंडळाच्या उत्सवाच्या तयारीस जानेवारीपासूनच सुरवात होते. पहिल्यांदाच कोरोनामुळे उत्सवाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 

उत्सव साधेपणाने साजरा करू पण शिवजयंती परंपररा खंडीत होऊ द्यायची नाही यावरही चर्चा झाली. मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, महेश जाधव, रविकिरण इंगवले, अजित राऊत, सदाभाऊ शिर्के, चंद्रकांत यादव, सुरेश जरग, लाला गायकवाड, श्रीकांत भोसले, मोहन साळोखे आदी उपस्थित होते. 
 
संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal No. 1 Marathi News : मराठी डिजिटलमध्ये eSakal चा दबदबा; कॉमस्कोरमध्ये नंबर 1

Horoscope : उद्या राम नवमीला बनतोय दुर्मिळ योग! पुढचे 6 दिवस 'या' 3 राशीच्या लोकांना हमखास धनलाभ; एका रात्रीत आयुष्यात घडेल मोठी घटना

Latest Marathi News Live Update : आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे; रुग्णवाहिकेतून थेट 'पंचायत समितीत' धडकत अनोखे आंदोलन

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीरला Sharad Pawar यांच्याकडून १२ लाखांची शिष्यवृत्ती; काका पवारांच्या तालमीला ५० लाख

Ashok Kharat: ‘कर्मकांडां’ची लांबलचक यादी! नाशिकचा भोंदू बाबा इंटरनेटवर ट्रेंडिंग; अशोक खरात केसने गाठली गुगल टॉप सर्च कॅटेगरी

SCROLL FOR NEXT