shivaji university 2nd rank in QS world ranking in kolhapur 
कोल्हापूर

Good News : 'क्यूएस' रँकिंगमध्ये शिवाजी विद्यापीठ देशात दुसरे

संदीप खांडेकर

कोल्हापूर : क्वाक्वेरेली सायंमडसतर्फे (क्यूएस) जाहीर झालेल्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये शिवाजी विद्यापीठाने देशातील संस्थांच्या क्रमवारीत प्रति पेपर सायटेशन निकषात द्वितीय स्थान पटकावले आहे. प्रति संशोधक सायटेशनमध्ये ते देशात सतरावे असून, क्यूएस ब्रिक्स रँकिंगमध्ये प्रति पेपर सायटेशन निकषात ब्रिक्स देशातील शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत २१ व्या क्रमांकावर आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. प्रति संशोधक पेपरच्या निकषात हा क्रमांक ४३ वा असल्याचेही त्यांनी सांगितले. 

डॉ. शिर्के म्हणाले, 'ब्रिक्स राष्ट्रांत ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. क्वाक्वेरेली सायंमडसतर्फे २००४ पासून क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग जाहीर केले जाते. गेल्यावर्षीपासून क्यूएसने ब्रिक्स देशांसाठी मानांकने जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. त्यात विद्यापीठाला स्थान मिळाले होते. यंदाही विद्यापीठाचा संशोधन विषयक निर्देशांक उत्कृष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयआयटीसारख्या संशोधनाला समर्पित संस्थांच्या मांदियाळीत विद्यापीठाने प्राप्त केलेले स्थान गौरवास्पद आहे.

ते म्हणाले, 'क्यूएसकडून विविध ५१ निकषनिहाय क्रमवारी जाहीर केली जाते. जगभरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षणासाठी जगातील अग्रगण्य संस्था निवडण्यासाठी ही क्रमवारी उपयुक्त ठरते. ती जाहीर करताना शैक्षणिक प्रतिष्ठा, नियोक्त्याची प्रतिष्ठा, सायटेशन, एच इंडेक्स स्त्रोतांचा विचार केला जातो. यापैकी पहिले दोन प्रत्येक विषयातील संस्थांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचे मूल्यांकन करण्यासाठी वापरले जातात.

उर्वरित दोन निर्देशक संबंधित विषयातील प्रति पेपर व एच इंडेक्सच्या संशोधन उद्धरणांच्या आधारे संशोधन प्रभावाचे मुल्यांकन करतात. हे जगातील सर्वात व्यापक संशोधन उद्धरण डेटाबेसमधून प्राप्त केले जाते. क्यूएस युनिव्हर्सिटी रँकिंग प्रत्येक देश व देशांच्या गटासाठी देखील प्रकाशित केले जाते‌. या देशांच्या गटात आशिया, लॅटिन अमेरिका, युरोप व मध्य आशियाचा  समावेश आहे. पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखा अधिकारी विलास पाटील उपस्थित होते.

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT