shivaji university exam of online students start from 15 april in kolahupur 
कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांची तारीख जाहीर

संदीप खांडेकर

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षेत ऑनलाइनचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेस १५ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. त्याबाबतची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे.

परीक्षा विभागाने ६ ते १५ एप्रिल दरम्यान होणाऱ्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा स्थगित केल्या होत्या. मात्र, त्यात सुधारणा करून पुन्हा परीक्षांचे वेळापत्रक बदलले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईनचा पर्याय निवडला आहे. त्यांच्या परीक्षा १५ एप्रिल तर ऑफलाईनचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर घेण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील रोजचा आकडा ३०० वर पोचला आहे. या परिस्थितीत विद्यार्थी परीक्षा कधी होणार याच्या चिंतेत असून, परीक्षा विभागासमोर अडचणी वाढत आहेत. परीक्षा विभागाने पुन्हा सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे, त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT