Dhairyasheel Mane esakal
कोल्हापूर

Shiv Sena : पक्षाशी गद्दारी का केली? संतप्त शिवसैनिकांनी धैर्यशील मानेंना ताफा अडवून विचारला जाब

सध्या राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

धैर्यशील मानेंनी गद्दारी केल्यानं अनेक दिवसांपासून शिवसैनिकांमध्ये खदखद निर्माण झाली होती.

कोल्हापूर : सध्या राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करत शिंदे गट बाहेर पडल्यापासून शिवसैनिक या गटावर कमालीचा नाराज आहे. याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला.

हातकणंगले मतदारसंघाचे शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने हे आज चंदूर इथं कार्यक्रमानिमित्त जात असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या शिवसैनिकांनी त्यांचा ताफा अडवला आणि पक्षाशी गद्दारी का केली? असा जाब त्यांना विचारला.

ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने बाचाबाची देखील झाली. मात्र, तातडीनं पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना बाजूला करत खासदार माने यांची गाडी पुढं मार्गस्थ केली.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी इचलकरंजीत जाहीर सभा घेत शिंदे यांच्यासोबत गेलेल्या खासदार धैर्यशील मानेंवर जोरदार टीका केली होती. यावेळी शिवसैनिक देखील आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते.

धैर्यशील मानेंनी गद्दारी केल्यानं अनेक दिवसांपासून शिवसैनिकांमध्ये खदखद निर्माण झाली होती. उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी आज खासदार मानेंचा ताफा अडवला आणि पक्षाशी गद्दारी का केली? असा जाब विचारला. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. दरम्यान, पोलिसांच्या मध्यस्थीनं खासदार मानेंची गाडी पुढं मार्गस्थ करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT